Nandurbar: नवापूर सीमा तपासणी नाक्यावर एसीबीचा छापा, दाेन शासकीय अधिका-यांसह एकास घेतलं ताब्यात

नवापूर पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई दरम्यान जमलेल्या जमावाकडनं जोरदार घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला गेला हाेता. त्याच पार्श्वभूमीवर नवापूर सीमा तपासणी नाक्यावर देखील याची पुनरावृत्ती रात्री झाली.
acb raids navapur check post near nandurbar
acb raids navapur check post near nandurbar Saam Digital

- सागर निकवाडे

Nandurbar :

नवापूर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना लाचलुचपत विभागाने पन्नास हजार रुपयांची लाच घेताना दाेन दिवसांपूर्वी अटक केली हाेती. हे प्रकरण ताजे असतानाच नवापुर सीमा तपासणी नाक्यावर रात्रीच्या सुमारास एसीबीने छापा टाकला. या छाप्यात दाेन शासकीय अधिकारी व एका नागरिकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईची चर्चा नवापूर शहरातील चाैकाचाैकात तसेच परिवहन कार्यालय येथे आहे. (Maharashtra News)

नवापूर सीमा तपासणी नाक्यावर अवैध वसुली सुरू असल्याची तक्रार एसीबीकडे तक्रारदाराने केली होती. त्यानुसार ठाणे विभागाच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने छापा टाकला. त्यानंतर एसीबीकडून ताब्यात घेतलेल्या तिघांची रात्री उशिरापर्यंत नवापूर पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात आली.

acb raids navapur check post near nandurbar
Abhijit Pakhare UPSC Success Story : जिद्दीच्या जोरावर अभिजित पाखरेंची यशाला गवसणी,चारवेळा अपयश तरीही जिद्द कायम ठेवत यूपीएससी परीक्षेत मिळवलं यश

दरम्यान नवापूर पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई दरम्यान जमलेल्या जमावाकडनं जोरदार घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला गेला हाेता. त्याच पार्श्वभूमीवर नवापूर सीमा तपासणी नाक्यावर देखील याची पुनरावृत्ती होताना दिसून आली. नवापूर आरटीओ कार्यालयाच्या बाहेर चोर चोर असे नारे देण्यात आले याची चर्चा शहरात सुरु आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

acb raids navapur check post near nandurbar
Pune Crime News : पुण्यासह मावळात मोठी कारवाई, हातभट्टी दारू अड्डयावर छापा; 1 कोटी 6 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com