Amol Mitkari Saam tv
महाराष्ट्र

Amol Mitkari : हाकेंवर मिटकरींचा पुन्हा निशाणा, प्रहारच्या नेत्यासोबतची ऑडिओ क्लिपच टाकली

Nanded News : अमोल मिटकरी यांनी राज्याच्या विधानसभा निवडणुकीवेळी अर्ज माघारीच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचीच असल्याची ऍड शेखर कुंटे यांच्यातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 

नांदेड : ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या सध्या चांगलीच जुंपली आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या एक्स हॅण्डलवर ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि भोकरचे प्रहारचे ऍड. शेखर कुंटे यांच्या संवादाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल करत एकप्रकारे मिटकरी यांनी हाकेंवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात जोरदार शाब्दिक वाद सुरु आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यातच अमोल मिटकरी यांनी राज्याच्या विधानसभा निवडणुकीवेळी अर्ज माघारीच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचीच असल्याची ऍड शेखर कुंटे यांच्यातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. 

क्लिपबाबत कुटेंचे स्पष्टीकरण 

अमोल मिटकरी यांनी त्यांच्या एक्स हॅण्डल वर ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकी संदर्भात अनेक खुलासे केले आहेत. अमोल मिटकरी यांनी व्हायरल केलेली ऑडिओ क्लिप माझी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचीच असल्याची ऍड शेखर कुंटे यांनी साम टीव्हीशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे. 

मोठी आर्थिक देवाणघेवाणीचा आरोप 

भोकर विधानसभेचा प्रहार पक्षाचा उमेदवार नामदेव आयलवाड यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपा आणि प्राध्यापक लक्ष्मण हक्के यांच्यात मोठी आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोप शेखर कुंटे यांनी केला आहे. दरम्यान नामदेव आयलवाड हे ओबीसी समाजाचे नेते आहेत. ऍड. शेखर कुंटे यांनी या संदर्भात भोकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात न आल्याने अखेर कुंटे यांनी या संपूर्ण प्रकाराची तक्रार न्यायालयात केली आहे. या प्रकरणात न्यायालयात माझ्या बाजूने न्याय लागेल असा विश्वास ऍड. शेखर कुंटे यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT