Ambad News : पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; अंबड तालुक्यातील डोमलगाव येथील घटना

Jalna News : अंबड तालुक्यातील डोमलगाव येथील दोन तरुण नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी ज्ञानेश्वर खराद या तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीपात्रात बुडाला.
Ambad News
Ambad NewsSaam tv
Published On

अक्षय शिंदे 
जालना
: दोघे मित्र गावापासून जवळच असलेल्या गोदावरी नदीवर पोहण्यासाठी गेले होते. मात्र नदी पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अंबड तालुक्यात घडली आहे. तर सोबत असलेला दुसरा पोहत बाहेर निघाल्याने वाचला असून घटनेची माहिती गावात दिली. घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.  

जालन्याच्या अंबड तालुक्यातील डोमलगाव येथे ही घटना घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर बाबुराव खराद (वय २१) असं घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. अंबड तालुक्यातील डोमलगाव येथील दोन तरुण नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी ज्ञानेश्वर खराद या तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो गोदावरी नदीपात्रात बुडाला. तर सोबत असलेल्या दुसरा मित्र नदीतून बाहेर निघून आला. 

Ambad News
Sanjay Raut : महाराष्ट्रातही मोदी फॉर्मुला चालणार; खासदार संजय राऊत यांची सरकारवर जोरदार टीका

ग्रामस्थांनी मृतदेह काढला बाहेर 

दरम्यान आपला मित्र नदीत बुडाल्याने घाबरलेल्या तरुणाने गावात धाव घेत घटनेची माहिती दिली. यानंतर घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी गोदावरी नदी पात्राकडे धाव घेत बुडालेल्या तरुणाचा शोध सुरू केला. गावातील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी तब्बल दोन तासांच्या शोध कार्यानंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यात आला. ज्ञानेश्वरच्या दुर्दैवी मृत्यूमुळे खराद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून डोमलगाव गावावर शोककळा पसरली आहे.

Ambad News
Bogus Cotton Seeds : ट्रॅव्हल्समधून प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी बियाणे तस्करी; अमरावतीत कारवाई, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

शालेय विद्यार्थिनीचा पाठलाग दोघांना करावास
लातूर : लातूरच्या मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शालेय विद्यार्थिनीचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. दरम्यान या प्रकरणातील दोन्ही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने ५ हजार रुपये दंड आणि सहा महिन्याचा कारावास सुनावला आहे. या खटल्यात पीडित मुलीचा जवाब आणि इतरांची साक्ष महत्वपूर्ण ठरली, त्यामुळे दोषींना ही शिक्षा देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com