Nanded Accident Saam tv
महाराष्ट्र

Nanded Accident : हरीण धडकल्याने विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा अपघात; एका विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

Nanded News : उमरी तालुक्यातील हातनी या गावातील विद्यार्थी आहेत. गावापासून जवळ असलेल्या बळेगाव येथील शाळेत सर्व विद्यार्थी शिक्षणासाठी रोज ऑटो रिक्षाने जात असतात.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : विद्यार्थ्यांना घेऊन जात असलेल्या ऑटो रिक्षाच्या समोर अचानक हरीण आले. या हरणाला वाचविण्याच्या प्रयत्नात ऑटो रिक्षाचा अपघात झाला. या अपघातात एका विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी असून इतर चार विध्यार्थी किरकोळ जखमी आहेत. 

नांदेडच्या (Nanded) उमरी तालुक्यातील हातनी फाटा येथे सदरचा अपघात घडला. उमरी तालुक्यातील हातनी या गावातील विद्यार्थी आहेत. गावापासून जवळ असलेल्या बळेगाव येथील शाळेत सर्व विद्यार्थी (Student) शिक्षणासाठी रोज ऑटो रिक्षाने जात असतात. आज देखील नेहमीप्रमाणे विद्यार्थी रिक्षाने जात असताना बळेगाव ते हातनी रस्त्यावर असलेल्या हातनी फाटा येथे अचानक ऑटोच्या समोर शेतातून वेगाने हरीण धावत आले. हे हरीण रिक्षाला धडकल्याने रिक्षाचा अपघात झाला.

ऑटो रिक्षा पलटी होऊन झालेल्या (Accident) अपघातात एक विद्यार्थी जागीच ठार झाला आहे. अन्य एक गंभीत जखमी झाला असून इतर चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. रिक्षा पलटी झाल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. यानंतर सर्व जखमी विद्यार्थ्यांना उमरी आणि नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फास्ट फूड अन् ऑनलाइन जेवणामुळे कॅन्सर, डॉक्टरांनी सांगितला नेमका धोका, वाचा काय म्हणाले तज्ज्ञ

Water Shortage : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुढील २४ तास पाणी राहणार बंद, जाणून घ्या कसं असेल नियोजन

Red Dress For Christmas: ख्रिसमस पार्टीसाठी रेड ड्रेसचे 5 लेटेस्ट पॅटर्न; तुम्ही दिसाल एकदम कडक

Maharashtra Live News Update: मुंबईतील बांद्रा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी

Dhurandhar Collection : 'धुरंधर'ला तगडी टक्कर द्यायला येतोय 'अवतार', रणवीर सिंहचा चित्रपट 500 कोटींपासून काही पावले दूर

SCROLL FOR NEXT