Mendhala village Mahesh Thakur died Saam Tv News
महाराष्ट्र

Nanded News : हातावर मेहंदी, साखरपुड्यासाठी पाहुणे जमले, पण नवरदेवाच्या अंत्ययात्रेला जाण्याची वेळ; अख्खं गाव रडलं

Nanded Youth Dies Before Marriage : साखरपुड्यासाठी पाहुणे जमले होते. पण नियतीला काही औरच मान्य होतं. महेश मेहंदी लावून टेरेसवर झोपला होता. त्याच्या अंगावर गरम पाण्याची टाकी उलटल्याने त्याचा मृत्यू झाला.

Prashant Patil

नांदेड : नातेवाईकातल्या मुलीसोबत प्रेम जडलं, त्यांच्या प्रेम विवाहाला दोन्ही कुटुंबाची सहमती मिळाली. साखरपुडा होणार असल्यानं नवरदेव आनंदी होता. आपल्या हातावर मेहंदी देखील लावली होती. मात्र साखरपुडा कार्यक्रमाच्या आधीच नवरदेवावर काळाने घाला घातला. हिटरच्या पाण्याची टाकी अंगावर पडल्याने ६५ टक्के भाजलेल्या नवरदेवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली. बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. महेशसिंह ठाकूर असं मयत तरुणाचे नाव आहे.

मयत महेश ठाकूर हा अर्धापूर तालुक्यातील मेंढला (बु) येथील रहिवासी आहे. हैदराबाद येथे तो काम करत होता. नातेवाईकातील मुलीसोबत त्याचे सूत जुळले. दोघांनी विवाह करायचं ठरवलं. दोघेजण नात्यातील असल्याने दोघांच्या कुटुंबियांनी विवाहाला सहमती दर्शवली. त्यानंतर त्यांचा साखरपुडा होणार होता. पण नियतीला काही औरच मान्य होतं.

महेश हाताला मेहंदी लावून टेरेसवर झोपला होता. बाजूला असलेली हिटरची गरम पाण्याची टाकी अचानक त्यांच्या अंगावर पलटली. त्यात तो ६५ टक्के भाजला, कुटुंबियांनी तात्काळ महेशसिंहला रुग्णालयात दाखल केले. तब्बल नऊ दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली, त्याला वाचण्यासाठी डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न सुरु होते. पण अखेर घटनेच्या नवव्या दिवशी त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात आई वडील, बहीण भाऊ असा परिवार आहे.

साखरपुड्यासाठी आलेले पाहुणेही घरातच होते. साखरपुड्यास जाणाऱ्या नातेवाईकांना नवरदेवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नियतीने आणली. संसाराच्या वेलावर पदार्पण करण्याआधीच नवरदेवाची अंत्ययात्रा निघाली अन संसार थाटण्याचं स्वप्न आणि प्रेमाची ती कहाणी अधुरीच राहिली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने दोन्ही कुटुंब शोकसागरात बुडाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...' गणेश गल्ली, तेजुकाया अन्.. मुंबईतील गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात

Ganpati Visarjan 2025: मुंबई ते दिल्ली गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी 'हे' आहेत शुभ मुहूर्त; जाणून घ्या सविस्तर

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करू नका; 10 दिवसांची पुजा ठरेल व्यर्थ

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT