marriage Saam tv
महाराष्ट्र

लग्नातून समाजसेवेचा अनोखा पॅटर्न; विमा काढून गावकऱ्यांनाच दिला लग्नाचा आहेर

nanded educated couple marriage : एका उच्चशिक्षित जोडप्याने आपल्या लग्नाचे औचित्य साधत, गावातील ग्रामस्थांचा अपघाती विमा उतरवलाय...लग्नकार्यातून समाजसेवेचा हा अनोखा पॅटर्न नेमका काय आहे? गावकऱ्यांना नवदांप्त्यांनी विम्याचं गिफ्ट का दिलं? पाहूयात चांगभलं या विशेष कार्यक्रमातून...

Suprim Maskar

लग्न म्हटलं की भपकेपणा,वारेमाप खर्च, रोषणाई आणि भली मोठी पंगत... हेच चित्र डोळ्यासमोर येतं. पण नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बहादरपुरा गावात एक असं लग्न पार पडलंय, ज्यानं संपूर्ण महाराष्ट्रासमोर सामाजिक बांधिलकीचा एक नवा आणि अनोखा आदर्श निर्माण केलाय....लग्नकार्यातून समाजसेवेचा हा अनोखा पॅटर्न नेमका काय आहे... चला पाहूयात...

कंधार तालुक्यातील बहादरपुरा गावात... सिद्धेश्वर आणि मंजुषा यांच्या विवाह सोहळ्यासाठी गावकऱ्य़ांची गर्दी जमली होती आणि पेठकर कुटुंबियांनी गावालाच एक अनोखा आहेर दिला..... पेठकर परिवारातील या विवाह सोहळ्यात पारंपरिक रीतीरिवाजांना फाटा देत, उधळपट्टी टाळत प्रत्येक गावकऱ्यांचा विमा काढला..

ग्रामीण भागात आजही अपघातासारख्या अनपेक्षित संकटांमुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होतात. अशा वेळी हक्काचा आर्थिक आधार देणारी 'विमा पॉलिसी' काढून देण्याचा निर्णय पेठकर कुटुंबियांनी घेतला...गावातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, अशा तब्बल 3500 नागरिकांचा 'अपघाती विमा' या कुटुंबाने स्वतःच्या खर्चातून काढलाय..त्यामुळे 'लग्नात आहेर घ्यायचा आणि द्यायचा' हा जुना पायंडा मोडीत काढत, संपूर्ण गावालाच सुरक्षेचं कवच देणाऱ्या सिद्धेश्वर आणि मंजुषाच्या या 'सोशल' लग्नाची चर्चा आता सर्वत्र होत आहे.

दरम्यान नव्या आयुष्याची सुरुवात करताना एका चांगल्या उपक्रमात सहभागी होता आलं याचा आनंद नवरीच्या चेहऱ्यावरही पाहायला मिळाला....

विम्यासारख्या गोष्टीबद्दल ग्रामीण भागात अजूनही म्हणावी तशी जागरूकता नाही. मात्र बहादरपुरातील या जोडप्यामुळे लोकांना भविष्यातील सुरक्षेचे महत्त्व पटेल आणि ऐनवेळी कुटुंबाला कोणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही. फक्त भाषणं ठोकून किंवा पोस्ट टाकून समाजसुधारणा होत नाही, तर त्यासाठी कृती करावी लागते, हेच बहादरपुरा येथील पेठकर कुटुंबियांनी दाखवून दिलयं... या अनोख्या विवाह सोहळ्यानं समाजसेवेचा एक नवा पायंडा पाडला.... हे मात्र निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deputy Election Commissioner: निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये बर्निंग कारचा थरार! डोलवली रेल्वे स्थानकाजवळ कार जळून खाक

दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

SCROLL FOR NEXT