Shruti Vilas Kadam
शरीरात व्हिटॅमिन B12, फोलेट, लोह किंवा इतर पोषक घटकांची कमतरता असल्यास तोंडात वारंवार अल्सर होऊ शकतात.
अधिक ताण, चिंता किंवा मानसिक थकवा यामुळे काही लोकांमध्ये तोंडातील अल्सर वारंवार होण्याची शक्यता वाढू शकते.
चुकून गाल किंवा जीभ चावणे, कडक पदार्थ खाणे किंवा दातांच्या टोकामुळे झालेली जखम अल्सरचे कारण ठरू शकते.
मासिक पाळी किंवा शरीरातील इतर हार्मोनल बदलांदरम्यान काही महिलांना तोंडात अल्सर होण्याचा त्रास जाणवू शकतो.
खूप तिखट, आंबट किंवा खारट पदार्थांचे सेवन केल्याने तोंडाच्या आतील त्वचेला त्रास होऊन अल्सर वाढू शकतात.
तोंडाची योग्य स्वच्छता न राखणे किंवा काही टूथपेस्टमधील घटकांमुळे तोंडातील अल्सरची समस्या काही लोकांमध्ये वाढू शकते.
वारंवार आणि दीर्घकाळ अल्सर होत असल्यास काही पचनसंस्थेशी संबंधित आजार किंवा इतर आरोग्य समस्या कारणीभूत असू शकतात. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.