Shruti Vilas Kadam
लोणच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मीठ वापरले जाते. त्यामुळे नियमित आणि जास्त प्रमाणात लोणचे खाल्ल्यास शरीरात सोडियमचे प्रमाण वाढू शकते.
अतिरिक्त मीठामुळे शरीरात पाणी साचू शकते. यामुळे रक्तदाब वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
रक्तदाब वाढल्यास शरीरात रक्तपुरवठा करण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागू शकते.
शरीरातील अतिरिक्त सोडियम बाहेर काढण्यासाठी किडनीला अधिक काम करावे लागते. त्यामुळे जास्त लोणच्याचे सेवन टाळणे योग्य ठरते.
जास्त मीठाच्या सेवनामुळे शरीरातून कॅल्शियमचे प्रमाण कमी होण्यास हातभार लागू शकतो, ज्याचा हाडांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
अतिरिक्त मीठाचे सेवन किडनी स्टोनच्या जोखमीशी संबंधित असू शकते. त्यामुळे आहारात मीठाचे प्रमाण मर्यादित ठेवणे महत्त्वाचे आहे.
लोणचं आवडत असेल तर ते पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. मात्र त्याचे प्रमाण मर्यादित ठेवणे आणि संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे.