Shreya Maskar
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात बर्की धबधबा वसलेला आहे. कोल्हापूर शहरापासून सुमारे ५०-५५ किमी अंतरावर हा हंगामी मान्सून धबधबा आहे.
बर्की धबधबा हा १५० ते २०० फूट उंचीवरून कोसळणाऱ्या नेत्रदीपक प्रवाहासाठी, घनदाट जंगलातील ट्रेकिंगच्या वाटांसाठी आणि गर्दीपासून दूर असलेल्या निसर्गरम्य परिसरासाठी प्रसिद्ध आहे.
हा धबधबा प्रामुख्याने पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) सक्रिय असतो, जेव्हा पाण्याचा प्रवाह सर्वाधिक असतो. पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर नजारा येथे पाहायला मिळतो.
पायथ्याच्या गावापासून घनदाट जंगलातील वाटेने २ ते ४ किलोमीटरचा निसर्गरम्य ट्रेक करावा लागतो. हिरव्यागार डोंगराळ परिसरात लपलेले धबधब्याचे दोन प्रवाह येथे पाहायला मिळतात.
पश्चिम घाटातील समृद्ध हिरवळ आणि पावसाळ्यातील विविध प्रकारची वनसंपदा, प्राणीसृष्टी यासाठी हा परिसर ओळखला जातो.
प्राचीन श्री महालक्ष्मी मंदिर, शाही न्यू पॅलेस संग्रहालय, पन्हाळा किल्ला, भवानी मंडप आणि आध्यात्मिक कानेरी मठ यांसारखी ऐतिहासिक ठिकाणे आहेत.
रंकाळा तलाव, राधानगरी अभयारण्य आणि रामतीर्थ धबधबा ही पावसाळी पर्यटन स्थळे आहेत. कुटुंबासह भेट देण्यासाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.