Saam Tv
काही वेळा आपल्या शरीरावर पांढऱ्या रंगाचे चट्टे बघायला मिळतात. हे विटामिन बी १२ ची कमतरता असण्याची लक्षणे आहेत किंवा ऑटोइम्यून समस्येचे संकेत असू शकतात.
रात्री झोपण्याच्या वेळेस पायाची अचानक जळजळ सुरू होते किंवा पाय सुन्न पडतात की काय असे भासू लागते. हे धोकादायक संकेत असू शकतात. मधुमेही रुग्णांमध्ये ही समस्या अधिक जाणवत असल्याचे सांगण्यात येते.
तोंडाला कायम वास येतो. शरीरात काहीतरी गंभीर समस्या उद्भवू शकते, याचे संकेत या लक्षणांतून मिळतात. अपचन, अॅसिडिटी किंवा यकृताशी संबंधीत ही समस्या असण्याची शक्यता असते.
हातपाय थंड पडणे ही रक्ताभिसरण किंवा थायरॉइड ग्लँडसारख्या समस्येचे संकेत असू शकते. रक्ताभिसरण व्यवस्थित होत नसल्याने हायपाय थंड पडण्यासारखी समस्या निर्माण होऊ शकते.
अनेकांना जास्त मीठ खाण्याची सवय असते. पण अधिक प्रमाणात मीठ किंवा खारट पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होत असेल तर, ते मिनरल लॉस किंवा एड्रनल फटीगचं लक्षण असू शकतं.
बऱ्याचदा आपले डोळे फडफडतात. हे मॅग्नेशियमची उणीव किंवा झोप पूर्ण न झाल्यामुळे नर्व्हस सिस्टममध्ये तणाव निर्माण झाल्याचे लक्षण असू शकते.
बऱ्याच जणांच्या त्वचेवर फोड्या किंवा चेहऱ्यावर पुरळ येतात. हे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, इन्सुलिनची पातळी वाढल्याने किंवा ताणतणाव वाढल्यामुळे चेहऱ्यावर किंवा त्वचेवर मोठ्या प्रमाणात पुरळ येऊ शकतात.
अनियमितपणे शौचास जाण्याची सवय किंवा तसे वाटू लागणे हे आरोग्याची समस्या असल्याचे संकेत आहेत. याशिवाय पचनक्रियेत बिघाड झाल्याचे लक्षण असते. त्यामुळे पचनक्रिया अधिक सुधारणे आवश्यक असते.
कानात शिट्टीसारखा आवाज येणे ही तणावात असणे, नसांमध्ये सूज किंवा विटामिन बी १२ ची कमतरतेसंबंधीत समस्या असू शकते.
वरील माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही. ती सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः काही निष्कर्ष काढण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.