Nanded News Saam TV
महाराष्ट्र

Nanded News : अधिष्ठात्याला टॉयलेट साफ करायला लावणे अंगलट; खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Nanded Dean Clean Toilet Issue : हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी काल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांना टॉयलेट साफ करायला लावले होते.

साम टिव्ही ब्युरो

Nanded Hospital News :

नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील मृत्यूतांडवानंतर अनेक नेत्यांनी रुग्णालयाला भेट दिली. यामध्ये शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील हे देखील होते. मात्र रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्याकडून टॉयलेट स्वच्छ करुन घेतलं. मात्र ही कृती त्यांना महागात पडली आहे. कारण खासदार पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी काल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांना टॉयलेट साफ करायला लावले होते. हे प्रकरण हेमंत पाटील यांच्या अंगलट आले.

या प्ररकणी अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांच्या तक्रारीवरुन खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यूप्रकरणानंतर खासदार हेमंत पाटील रुग्णालयात होते. त्यांनी अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांना त्यांच्या कार्यालयातील आणि रुग्णालयातील एका वार्डातील शौचालयाची सफाई करायला लावली.

या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशीरा हेमंत पाटील आणि अन्य 10 ते 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार नायक यांनी दिली आहे. (Political News)

मुंबईतील BMC मार्ड संघटना आक्रमक

नांदेडच्या घटनेनंतर अधिष्ठात्यांशी शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी गैरवर्तन केल्याप्रकरणी मुंबईतील BMC मार्ड संघटना देखील आक्रमक झाली आहे. नांदेड रुग्णालयात अस्वच्छतेवरून खासदार हेमंत पाटील यांनी अधिष्ठात्यांना स्वच्छतागृह साफ करण्यास लावत गैरवर्तन केल्याप्रकरणी हेमंत पाटील यांनी तात्काळ माफी मागण्याची मागणी मुंबईतील BMC मार्ड संघटनांनी केली आहे. माफी न मागितल्यास BMC मार्डतर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharastra Politics: राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार; दोन बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश

MSRTC: रील्स, लाईव्ह स्ट्रीमिंग...; गणवेशात व्हिडिओ बनवण्यास बंदी, ST कर्मचाऱ्यांसाठी नवे नियम लागू

विलास घुले मृत्यू प्रकरण तापलं! खासदाराच्या मुलाला अटक करा नाहीतर...; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण

'गुंगी गुडिया'ला धनंजय मुंडेच जबाबदार? सुनील तटकरेंनी मुंडेंचे कान टोचले

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

SCROLL FOR NEXT