Nanded News : शिंदे गटाचा खासदार संतापला, अधिष्ठात्यालाच सरकारी हॉस्पिटलमधील टॉयलेट स्वच्छ करायला लावलं VIDEO

Nanded Hospital News : हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी देखील आज नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला भेट दिली.
Nanded News
Nanded NewsSaam TV
Published On

संजय सूर्यवंशी

Nanded News :

नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये ३६ तासांमध्ये ३१ रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. यावरुन विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली. या मृ्त्यूंना जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. एकीकडे सरकारवर गंभीर आरोप करत यासाठी जबाबदार धरलं जात असताना, शिवसेना शिंदे गटाचे खासदार आक्रमक झाले आहे.

अनेक राजकीय नेते आता नांदेडच्या शासकीय रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी देखील आज नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला भेट दिली. यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांना रुग्णालयातील शौचालय करायला लावलं. (Latest Marathi News)

Nanded News
Nanded Hospital News: नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच, रुग्णालयात आणखी ७ रुग्ण दगावले; मृतांचा आकडा ३१ वर

हेमंत पाटील रुग्णालयाची पाहणी करत असताना त्यांना तेथे घाणीचे साम्राज्य पसरल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यासोबत रुग्णालयाचे डीन देखील होते. यावेळी संतापलेल्या खासदार पाटील यांनी डीन वाकोडे यांना हातात झाडू घेऊन शौचालय साफ करायला लावले. (Political News)

Nanded News
Ghati Hospital News: छत्रपती संभाजीनगरमध्येही नांदेड'ची पुनरावृत्ती, घाटी रुग्णालयात एकाच दिवशी १० रुग्ण दगावले

दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

रुग्णालयातील असुविधा पाहून हेमंत पाटील यांनी रुग्णालय प्रशासनाला खडेबोल सुनावले. रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सोय देखील नाही. रुग्णांच्या मृत्यूसाठी प्रशासनातील जे अधिकारी डॉक्टर दोषी असतील त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com