Nanded 2 sisters dies over pesticites  AI Image
महाराष्ट्र

Nanded : दुर्दैवी! दोन सख्ख्या बहिणी रात्री आई वडिलांच्या कुशीत झोपल्या, सकाळ उजडताच कुटुंब हादरलं

Nanded News : नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे घरात कीटकनाशकाचा फैलाव झाल्याने ६ आणि ४ वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Alisha Khedekar

  • नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे दुर्दैवी घटना

  • कीटकनाशकाच्या फैलावामुळे दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

  • कीटकनाशकाच्या फैलावानंतर आई-वडिलांसह दोन्ही मुलींना उलट्यांचा त्रास

  • कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला

नांदेडमध्ये भयंकर घटना घडली आहे. धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे कीटकनाशकाचा फैलाव झाल्याने दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोही मल्लेश डेबेकर (वय ६) आणि आराध्या मल्लेश डेबेकर (वय ४) अशी मृत मुलींची नावे आहेत. या घटनेने मुलींच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडमधील धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे राहणाऱ्या डेबेकर कुटुंब राहत. या कुटुंबातील मल्लेश डेबेकर यांच्या आरोही आणि आराध्या या मुली होत्या. डेबेकर कुटुंबियांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दोन्ही मुली जेवणानंतर आई-वडिलांसोबत घरातील एका खोलीत झोपल्या होत्या. याच खोलीत हरभरा बियाण्याला कीड लागू नये म्हणून पोत्यामध्ये कीटकनाशक ठेवण्यात आले होते.

रात्रीच्या सुमारास या कीटकनाशकाचा फैलाव झाल्याने त्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांवर झाला. धक्कादायक म्हणजे या फैलावामुळे काही वेळातच आई-वडिलांसह दोन्ही मुलींना अचानक उलट्यांचा त्रास सुरू झाला. परिस्थिती गंभीर होत असतानाच गुरुवारी पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास आरोही आणि आराध्या या दोन्ही बहिणींचा मृत्यू झाला.

एकाच वेळी दोन्ही लेकरांना गमावल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे. या घटनेनंतर घरामध्ये कीटकनाशके किंवा अन्य रासायनिक पदार्थ साठवताना विशेष काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. बियाणे साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांची योग्य पद्धतीने आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करण्याबाबत ग्रामीण भागात जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

Acicdent News : मध्यरात्री महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रकने ७ वाहनांना उडवले, ३ जणांचा मृत्यू, १० गंभीर

Cumin water: सलग 7 दिवस प्या जिऱ्याचं पाणी; होणारे फायदे पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Cholesterol control: औषधं सोडा! तुमच्या दररोजच्या या 5 सवयींमुळे मेणासारखं वितळेल कोलेस्ट्रॉल

मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस; 'या' १० अटींनुसार उपोषणाला परवानगी, जरांगेंकडून प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT