Nanded संतोष जोशी
महाराष्ट्र

धक्कादायक: लग्नासाठी मुलगी द्यायला नकार, संतापलेल्या भाच्याने केलं मामालाच ठार

मामा झोपेत असताना भाच्याने कुऱ्हाडीने सपासप वार करत मामाची हत्या केली.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड: नांदेडमध्ये (Nanded) मामा मुलीचं लग्न आपल्याशी लावून देत नसल्याचा राग मनात धरुन भाच्यानेच झोपेतच मामावर कुऱ्हाडीने सपासप वार करुन ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील (Hadgaon Taluka) चाभरा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी बालाजी दिगंबर काकडे हे अंगणात झोपले असताना अज्ञात व्यक्तीने कुऱ्हाडीने वार करुन त्यांचा खुन केला होता. हा खुन कोणी आणि का केला याचा तपास पोलिस (Police) करत असताना या तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. ती म्हणजे बालाजी काकडे यांचा खुन त्यांचा भाचा एकनाथ जाधव याने केला असल्याचं तपासाच समोर आलं.

पाहा व्हिडीओ -

एकनाथ जाधव याने मामा लक्ष्मन यांच्या मुलीला लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र, मामाने भाचा मजूरी करतो आणि मुलगी शिकलेली आहे त्यामुळे मुलीचं लग्न नोकरीवाल्या मुलाशी लावून देणार आहे. तुला मुलगी देणार नाही असं म्हटलं होतं.

मामाने मुलगी द्यायला दिलेला नकार भाच्याच्या चांगलाच जिव्हारी लागला, राग मनात धरुन मामा बालाजी काकडे झोपेत असताना कुऱ्हाडीने वार करुन खुन केल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात उघडकीस आली आहे. या प्रकरणी हदगाव पोलिसात एकनाथ जाधव विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एकनाथला अटक ही केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

Maharashtra Infrastructure: उत्तर महाराष्ट्रासाठी खूशखबर! नव्या रेल्वे मार्गाचे कामाला सुरूवात, ४ जिल्ह्यांना होणार फायदाच फायदा

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा, निवडणुकीसाठी स्वतंत्र मोर्चेबांधणी

Nashik Police: जिथं दहशत माजवली तिथंच धिंड; पॅटर्नच वेगळा,नाशिक पोलिसांची राज्यभरात चर्चा

BMC अधिकारी ACB च्या जाळ्यात, लाच घेताना तिघांना रंगेहाथ पकडले

SCROLL FOR NEXT