Nanded Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: नांदेड ऑनर किलिंग: मैत्रिणींना संशय आला अन्‌ समोर आली महाराष्ट्राला हादरवणारी घटना

नांदेड ऑनर किलिंग: मैत्रिणींना संशय आला अन्‌ समोर आली महाराष्ट्राला हादरवणारी घटना

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : नांदेडमध्ये ऑनर किलिंगचा प्रकार समोर आला. मुलीचे प्रेमसंबंध उघडकीस आल्याने भावी डॉक्टर मुलीचा वडील, भाऊ, मामा आणि दोन चुलत भावांनी मिळून गळा आवळून (Crime News) खुन केला. त्यानंतर शेतात नेऊन जाळून टाकले. शुभांगीच्या मैत्रिणींना काही तरी गडबड झाल्याचे लक्षात आल्‍यामुळे शुभांगीच्‍या मृत्‍यूचे कारण समोर आले आहे. (Live Marathi News)

नांदेड शहरापासून जवळच असलेल्या पिंपरी महिपाल येथील शुभांगी जोगदंड आणि अमोल कदम यांच्यात प्रेम संबध जुळले होते. दोघेही नांदेडच्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये बीएएमएसचे शिक्षण घेत होते. दरम्यानच्या काळात शुभांगीचे लग्न जमलं होते. मात्र, शुभांगी आणि अमोलच्या प्रेम संबंधाची बाब पुढे आल्याने हे लग्न मोडले. याचा राग मनात होता.

राग मनात धरुन समाजात आपली बदनामी होत असल्याने शुभांगीला २२ जानेवारीला वडील जनार्दन जोगदंड, भाऊ केशव जोगदंड, मामा गिरधारी जोगदंड, कृष्णा आणि गोविंद या चुलत भाऊ अशा पाच जणांनी शुभांगीचा गळा अवळून खुन केला. त्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरुन शेतात नेऊन जाळला. तसेच राख, अस्थी जवळच्या नदीत सोडले.

मैत्रिणींच्‍या लक्षात आल्‍याने घटना उघड

शुभांगीच्या मैत्रिणींना काही तरी गडबड झाल्याचे लक्षात आल्याने मैत्रिणीने महिला आयोगाकडे तक्रार केली. तसेच गावच्या पोलिस पाटलांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर या तक्रारी वरुन ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update : सोमठाणा गावात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी प्रेत ठेवले थेट ग्रामपंचायतमध्ये

आंदोलनानंतर बँकांची मराठींसाठी मेगाभरती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Politics : निवडणुकीआधी अजित पवारांची ताकद वाढली, एकाचवेळी ४०० कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai Crime : मुंबईत रिक्षा चोरांचा सुळसुळाट; ७ ऑटोरिक्षा रस्त्यावरून लंपास, पोलिसांकडून दोघांना अटक

SCROLL FOR NEXT