Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded Crime : गरबा चालवण्यासाठी हप्त्याची मागणी करत तलवारीने मारहाण; तिघांना घेतले ताब्यात

Nanded News : गरबा दांडिया आयोजकांची रंगत वाढत असून अशात नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला. व्यावसायिकाकडे हप्त्यांची मागणी करत मारहाण करण्यात आली. मात्र पोलिसांनी यांना लागलीच ताब्यात घेतले

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 

नांदेड : नवरात्रोत्सव सुरु असल्याने सर्वत्र गरबा रास दांडियाची आयोजन करण्यात आले आहे. मात्र गरबा चालवायचा असेल तर आम्हाला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. नाही दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत ​​डेकोरेशन व्यावसायिकावर तलवारीने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक नांदेड शहरात घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

नवरात्रोत्सव अंतिम टप्प्यात पोहचला आहे. मागील आठ दिवसांपासून नवरात्रोत्सवाची धूम सुरु असून अनेक ठिकाणी देवीची स्थापना करत देवीच्या समोर गरबा रास दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सात ते रात्री उशिरापर्यंत गरबा दांडिया खेळला आहे. मात्र या गरबा दांडिया आयोजकांना त्रास दिला जात असल्याचा प्रकार नांदेड शहरात घडला आहे. थेट पैशांची मागणी करत मारहाण करण्यात आली.  

डेकोरेशन व्यावसायिकाकडे हप्त्याची मागणी 

नांदेड शहर आणि जिल्ह्यात सध्या नवरात्र महोत्सवाचा आनंद शिगेला पोहोचला आहे. अनेक ठिकाणी दांडिया, गरबा महोत्सव सुरू आहे. याच महोत्सव दरम्यान शहरातील व्यंकटेशनगर येथे जय दुर्गामाता महोत्सवात २५ सप्टेंबर रोजी वैभव गुरव या डेकोरेशन व्यावसायिकास तुला गरबा चालवायचा असेल, तर आम्हाला रोज दहा हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल, अन्यथा जिवे मारू अशी धमकी दिली.

तिघांना ताब्यात घेत काढली धिंड 

इतकेच नाही तर गुरव यांच्यावर तलवारीने वार देखील करण्यात आले. या प्रकारानंतर गुरव यांनी पोलिसात तक्रार दिली. यानंतर वजीराबाद पोलिसांनी हप्त्याची मागणी करत मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली. यानंतर पोलिसांनी या तिन्ही आरोपींची घटनास्थळी नेऊन धिंड काढली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सौरमालेतील कोणत्या ग्रहावर दिवस सर्वात मोठा असतो?

Maharashtra Politics : भाजपच्या ऑपरेशन लोटसला ब्रेक लावण्यासाठी अजित पवारांची मोठी खेळी; थेट मंत्री मैदानात उतरवला

राग आल्यानंतर चेहऱ्याचा रंग लाल का होतो?

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

६० लिटर पाण्यात ९०० किमी धावणार कार? इराणच्या वैज्ञानिकाचा व्हिडिओ व्हायरल, वाचा नेमकं सत्य काय

SCROLL FOR NEXT