nanded crime news
nanded crime news Saam Tv
महाराष्ट्र

Nanded Crime News: वरातीत नाचण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी; एकाचा मृत्यू, अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी

Nanded News: नांदेडमधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. नांदेडमध्ये वरातीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटात गुरुवारी रात्री हाणामारी झाल्याची घटना घडली. नांदेड शहरालगत असलेल्या बोंडार हवेली गावात ही घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांत अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरालगत असलेल्या बोंडार हवेली गावात वरातीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटात गुरुवारी रात्री हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीत एका युवकाचा मृत्यू झाला आहे.

एका गटाच्या सात जणांनी दुसऱ्या गटाच्या एका युवकावर चाकू आणि धारदार शस्त्राने वार केले. यात २३ वर्षीय अक्षय भालेराव या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी हत्या आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी सात आरोपीना अटक केली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर गावात सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बोंडार हवेली गावात झालेल्या हाणामारीनंतर गावात तणावपूर्ण वातावरण आहे. गावात रात्री झालेल्या दगडफेकीत काही वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

या सर्व घटनेचा पंचनामा सुरू आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. या प्रकरणी काही जण सोशल मीडियावर अफवा पसरवत असल्याने हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडलं?

नांदेड (Nanded) शहरालगत असलेल्या बोंडार हवेली गावात वरात सुरू होती. या गावात वरातीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. एका गटाच्या सात जणांनी दुसऱ्या गटावर शस्त्राने हल्ले केले. यावेळी दगडफेकीची देखील घटना घडली.

या हल्ल्यात एका गटातील २३ वर्षीय अक्षय भालेराव नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. सध्या या गावात पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. या प्रकरणी हत्या आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी सात आरोपीना अटक केली आहे.

Tips for Healthy Hair : केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतेल 'या' फळांचे सेवन

Sunny Leone: काळा ड्रेस, मोकळे केस; सनीचा बोल्ड अंदाज करतोय घायाळ

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा रक्षकाकडून महिला भाविकास धक्काबुक्की

Mumbai Indians Playing XI: हैदराबादविरुद्ध अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार? पाहा कशी असेल मुंबईची प्लेइंग ११

Solo Travel Tips: एकट्याने फिरायला जाण्याची आवड आहे;मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT