Nanded Builder Dies of Heart Attack Saam Tv News
महाराष्ट्र

महिनाभरावर लग्न, जिममधून येताच हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध बिल्डरचा करुण अंत; नांदेड हळहळलं

Nanded Builder Dies of Heart Attack : रोजच्याप्रमाणे शुभम हे व्यायामासाठी जीमला गेले होते. जीम करून ते घरी परतले. घरी आल्याबरोबर ते पाणी प्यायले. तेवढ्यात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

Prashant Patil

नांदेड : व्यायाम करुन घरी आल्यानंतर बांधकाम व्यावसायिक तरुणाचा हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या दीड महिन्यावर त्यांचे लग्न होते. नांदेड शहरातील अयोध्यानगरीत ही मनाला चटका लावणारी घटना घडली आहे.

जिममध्ये व्यायाम करून घरी येताच एका बांधकाम व्यावसायिक तरूणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. नांदेड शहरातील अयोध्यानगरीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. शुभम ठाकूर (वय २९) असं मृत तरुणाचं नाव आहे. विशेष म्हणजे शुभम यांची आठ दिवसांपूर्वी सोयरीक जुळली झाली होती. तीन ऑगस्ट रोजी त्यांचा लग्न ठरलं होतं, मात्र नियतीनं घात केला. या घटनेनं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शुभम ठाकूर हे अयोध्यानगरी येथील रहिवासी असून तो बांधकाम व्यवसायिक होता. सामाजिक कार्यात देखील ते अग्रेसर राहत होते. दरम्यान, रोजच्याप्रमाणे शुभम हे व्यायामासाठी जीमला गेले होते. जीम करून ते घरी परतले. घरी आल्याबरोबर ते पाणी प्यायले. तेवढ्यात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

कुटुंबियांनी त्याला तात्काळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. विशेष म्हणजे शुभमचा नुकताच साखरपुडा झाला होता. तसेच येत्या तीन ऑगस्टला त्यांचा विवाह देखील निश्चित झाला होता. मात्र, अंगाला हळद लागण्यापूर्वीच शुभमसोबत नियतीने घात केला. या घटनेनं कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT