Maharashtra Nanded Mahayuti  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : नांदेडमध्ये महायुतीत धुसफूस! निवडणूक स्वबळावर लढण्याचा शिवसेनेच्या आमदाराचा भाजपाला कडक इशारा

Maharashtra Nanded Mahayuti News : नांदेड महापालिका निवडणुकीआधी भाजप–शिवसेना युतीत तणाव वाढला आहे. जागावाटपावरून झालेल्या बैठकीत अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे.

Alisha Khedekar

  • नांदेड महापालिका निवडणुकीआधी भाजप–शिवसेना बैठक

  • ६ जागांच्या प्रस्तावावरून शिवसेना नाराज

  • अपमानास्पद वागणुकीचा आरोप; स्वबळावर लढण्याचा इशारा

  • राष्ट्रवादीसोबत युतीचा पर्याय चर्चेत

पालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून सर्वत्र निवडणुकांच्या तयारींची लगबग सुरु आहे. अशातच नांदेड महापालिका निवडणुकीसाठी भाजपा शिवसेनेत बैठक झाली. भाजपाची पाच सदस्यीय समिती आणि शिवसेनेच्या तीन जिल्हा प्रमुखामध्ये बैठक झाली. मात्र बैठकीत भाजपाकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदारांनी केला आहे.

नांदेड महापालिका निवडणुकीसाठी भाजपा शिवसेनेत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण मध्ये शिवसेनेचे आमदार असताना ८१ पैकी फक्त सहा जागा घ्या असा प्रस्ताव भाजपाने शिवसेनेसमोर ठेवला. मात्र किमान ५० टक्के जागा दिल्या तर युती होउ शकते, नाही तर शिवसेना स्वबळावर लढेल असा इशारा शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिला.

यानंतर ते पुढे म्हणाले, वाढदिवसाच्या निमित्ताने आपण राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट घेतली.त्याठिकाणी राष्ट्रवादीच्या महानगर अध्यक्षांनी युतीचा प्रस्ताव दिला . शिवसेना राष्ट्रवादीच्या युती बाबत आम्ही सकारात्मक विचार करत आहोत. शिवाय राज्यात सेना भाजपाची युती होत आहेत. मात्र नांदेड मधील स्थानीक समीकरण वेगळी आहेत. अशोक चव्हाण यांचं एकटा चलो रे असं राजकारण असल्याचं त्यांनी म्हटलं.

पाटील पुढे म्हणाले, सहकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे बरोबर नाही. सन्मान पूर्वक त्यांनी ४० जागा दिल्या तर युती होउ शकते. भाजपा सोबत युतीसाठी आम्ही पण सकारात्मक आहोत. मात्र शिवसेनेचे दोन आमदार शहरात असताना पाच किंवा सहा जागा दिल्या जात असतील तर युती कशी होईल असा प्रश्न हेमंत पाटील यांनी उपस्थित केला. दरम्यान आता नंदुरबारमध्ये पालिकेच्या निवडणुकांआधी काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंजनगाव सुर्जी येथे नगरपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपची जाहीर सभा

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT