Nanded Accident
Nanded Accident Saamtv
महाराष्ट्र

Nanded Accident: मन सुन्न करणारी घटना! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले, २ तरुणांचा जागीच मृत्यू; लग्नाहून परतताना...

Gangappa Pujari

संजय सुर्यवंशी, प्रतिनिधी...

Nanded News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात रस्ते अपघातांची मालिकाच सुरू आहे. ज्यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. नुकतीच नांदेडमधून एका दुर्देवी अपघाताची घटना समोर आली आहे. भोकर येथ लग्न आटोपून घराकडे परतताना भोकर - नांदेड मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, गुरूवार (११, मे) नांदेड (Nanded) शहरातील चौपाळा भागातील पंचशील नगर येथील संदीप गौतम काळे आणि राहुल बाबुराव कोलते हे दोघेजण आपली बुलेट क्रमांक एम एच 26 बी झेड 2036 वरून आज लग्नासाठी भोकर येथे गेले होते. यावेळी लग्न आटोपून दोघेही त्यांच्या घराकडे जात होते. (Latest Marathi News)

सहा वाजता पेट्रोल पंपा नजीक कन्हैया स्वीट मार्टच्या समोर (RJ14 GP 4757) क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या बुलेटला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की बुलेट फरफटत गेली. त्यामुळे दोन्ही तरुण ट्रकच्या चाकाखाली आले. या धक्कादायक घटनेत दोन्ही तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला. (Accident News)

या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: काँग्रेसच्या माजी नगरसेविका मीरा पाटील यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

Abhishek Ghosalkar: हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सर्व CCTV फुटेज कुटुंबियांना दाखवा: हायकोर्ट

Night Skin Care: मुलायम त्वचेसाठी रात्री झोपण्यापुर्वी करा 'या' गोष्टी

Sonalee Kulkarni : दुबईमध्ये उगवली शुक्राची चांदणी; साडीत खुललं अप्सरेचं सौंदर्य

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत भर; नायब राज्यपालांनी केली NIA द्वारे चौकशीची मागणी, काय आहे नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT