Parbhani News: हदयद्रावक! सेफ्टी टँक साफ करताना घडला अनर्थ, एकाच घरातील ५ जणांचा मृत्यू; मन सुन्न करणाऱ्या घटनेने हळहळ

Parbhani News Update: या दुर्घटनेतील जखमी तरुणाचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
Parabhani News
Parabhani NewsSaamtv

राजेश काटकर, प्रतिनिधी...

Parbhani News: परभणीच्या सोनपेठ तालुक्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. सोनपेठ तालुक्यातील भाऊचातांडा शिवारात सेफ्टी टँकचे सफाईचे काम करत आसतांना पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक दुर्घटना घडली आहे. मृतांपैकी पाचही जण एकाच कुटूंबातील असल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Parabhani News
Chandrapur Crime News: बँकेच्या अध्यक्षांवर अंधाधुंद गोळीबार; गोळ्या झाडून आरोपी फरार

ही संपूर्ण घटना काल (11, मे) घडली असून याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, सोनपेठ तालुक्यातील ऊचातांडा शिवारात असलेल्या एका शेतात आखाड्यावरच्या सेफ्टी टँकचे सफाईचे काम सुरू होते. यासाठी सहा जण ह्या शौचालयाच्या टॅँकमध्ये उतरले. यावेळी टँकमध्ये पडल्याने गुदमरुन या मधील पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी आहे. (Parbhani Crime News)

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी असलेल्या सहाव्या मजुरांस परळी येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी पाठवले आहे. शेख साबेर (वय18) असे या जखमी तरुणाचे नाव असून त्याचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Parabhani News
Maharashtra Politics: ...तरच 'संपूर्ण न्याय' झाला असता; SC च्या निकालानंतर तज्ज्ञांनी वेधले महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष

या दुर्घटनेत मृत झालेल्यांमध्ये सादेख शेख ( वय45), मुलगा शाहरुख शेख (वय 19), जुनेद शेख (वय 29), नविद शेख (वय 25), फिरोज शेख (वय 19) अशा एकाच घरातील पाच जणांचा समावेश आहे. ह्या सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com