Nanded Accident Saam Tv
महाराष्ट्र

भरधाव ट्रॅव्हल्सच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू, थरार CCTVत कैद

अपघात इतका भयंकर होता की, ट्रॅव्हल्सने अक्षरश: दुचाकीला फरफटत नेले.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड - नांदेड शहरातील (Nanded) नमस्कार चौकात एक भीषण अपघात (Accident) झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने (Travel Bus) दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी २६ एप्रिल) रोजी ही घटना घडली आहे.

शिवानंद डांगे आणि इंदुबाई डागे असं मृत पती पत्नीचे नाव असून गोविंद मोरे असं गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डांगे पती पत्नी आणि गोविंद मोरे हे तिघेजण एकाच दुचाकीवर (Bike Accident) नांदेडहून मुदखेडच्या दिशेने जात होते. शहरातील नमस्कार चौकात आल्यानंतर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने डांगे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघात इतका भयंकर होता की, ट्रॅव्हल्सने अक्षरश: दुचाकीला फरफटत नेले. यामध्ये डांगे पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर मोरे हा गंभीर जखमी झाला. दरम्यान, या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT