Manasvi Choudhary
श्रावण महिना सुरू झाला की सण-उत्सवांसोबतच खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल केला जातो. श्रावणात सात्विक पदार्थ्यांचे सेवन केले जाते.
श्रावणात घरोघरी अळूभाजी बनवली जाते. अळूच्या भाजीचे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर गुणधर्म आहेत.
श्रावण महिन्यात पावसाचे वातावरणात असते. या ऋतुमध्ये शरीराची पचनशक्ती मंदावते. त्यामुळे हलक्या पदार्थ्याचे सेवन करणे फायदेशीर असते.
पावसाळ्यात शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पालेभाज्यांचे सेवन महत्वाचे असते. अळूची पाने ही पचनास हलकी आणि शरीराला ऊर्जा देणारी मानली जातात.
अळूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते आणि पचनक्रिया सुरळीत चालते.
अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह , कॅल्शियम आणि पोटॅशियम ही पोषकघटके असतात.
अळूच्या पानांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स असतात. जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा आणि केसांना फायदा होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.