Saam Tv
संपूर्ण चेहरा सुंदर असतो. पण दातांमुळे किंवा दातांमध्ये असलेल्या फटीमुळे लूक खूप खराब होतो. फटीमुळे लाज वाटते. नीट स्माईल देखील करता येत नाही. काही उपाय करून तुम्ही कमी करू शकता.
दिवसातून दोन वेळा फ्लोराइडयुक्त टुथपेस्टने ब्रश करा. दात आणि हिरड्या निरोगी ठेवल्याने फट वाढण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.
डेंटल इप्रेशन किट बाजारात सहज उपलब्ध असतो. या किटमध्ये दिलेल्या साहित्यानुसार तुम्ही दातांमधील फट घरच्या घरी कमी करू शकता.
दात हलवून त्यांची योग्य रचना करण्यासाठी आणि अंतर पूर्णपणे बंद करण्यासाठी ब्रेसिझ किंवा ट्रान्सपरंट अलाइनर्स वापरले जातात.
दातांचे सौंदर्य आणि स्माइल सुधारण्यासाठी ही एक अतिशय उत्तम पद्धत आहे. यामुळे दातांमधील फटीशिवाय, रंग, आकार सहज बदलता येतो.
दातांमधील फट कमी करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. यात फटीमध्ये दाताच्या रंगाची रेसिन लावले जाते. त्यामुळे दात सुंदर दिसतात.
दातांच्या गॅपची समस्या दूर करण्यासाठी रिटेनर्सचा वापर करू शकता. यात दातांवर दबाव टाकून त्यांची शिफ्टिंग केली जाते आणि गॅप भरली जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.