Saam Tv
चेहरा धुतल्याने धूळ, घाण निघून जाते हे मान्य आहे. पण याचा अतिरेक झाला तर त्वचेवरील नॅचरल ऑईल निघून जाते. मग त्वचेवर मुरूमांची समस्या वाढते. त्यामुळे दिवसातून 2 वेळाच चेहरा स्वच्छ धुवा.
हातांवरील धूळ, तेल आणि बॅक्टेरिया चेहऱ्यावर लागल्याने खाज सुटते. त्यामुळे अॅलर्जी होते आणि मुरूम वाढू लागतात.
मुरूम फोडल्याने त्याची लस सगळीकडे लागते. त्यामुळे मुरूम वाढत जातात . मुरूम फोडल्याने डाग आणि खुणा देखील राहतात.
मेकअप त्वचेवर जास्त वेळ राहू देऊ नका. त्यामुळे पोर्स बंद होण्याची शक्यता आहे. यामुळे देखील मुरूम येण्याची शक्यता वाढते.
मुरूम असतील तर त्यावर स्क्रबचा वापर न करू नका. यामुळे जळजळ वाढू शकते. त्यामुळे सौम्य स्किनकेअर प्रोडक्ट्सचा वापर करा.
झोपताना चेहरा उशीच्या संपर्कात येतो. उशीवर जमा असलेले तेल, घाम, धूळ चेहऱ्याच्या संपर्कात येतात. त्यामुळे मुरूम वाढते. कव्हर बदलत राहा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.