Saam Tv
काळ्या पडलेल्या गुडघ्यांवर 15 ते 20 मिनिटे अॅलोवेरा जेलने मसाज करा. यामुळे त्वचा मऊ होईल आणि काळेपणा कमी होईल.
नारळाच्या तेलात साखर किंवा अक्रोडची पावडर मिक्स करून त्याच्या स्क्रब तयार करा. हा स्क्रब गुडघ्याला लावल्याने डेड स्किन निघुन जाईल.
टॅनिंग काढण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर केला जातो. बटाट्याचे काप किंवा त्याचा रस गुडघ्याला लावल्याने काळपटपणा कमी होईल
लिंबाच्या रसात साखर मिसळ्याने गुडघ्यांवर स्क्रब करा. नंतर कोमट पाण्याने धुवा. काळेपणा हळूहळू कमी होईल.
बेकिंग सोड्यात दूध मिसळून हे मिश्रण पायाला लावावे. 3 ते 4 मिनिटे ही पेस्ट तशीच ठेवून पाण्याने धुवावी.
ऑलिव्ह ऑईल आणि साखर एकत्र करून मिश्रण गुडघ्यांवर लावावे. काही वेळ पेस्ट तशीच ठेवून धुवून टाकावी. यामुळे काळेपणा कमी होण्यास मदत होईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.