नानासाहेब कापडणीस अमित कापडणीस Saam Tv
महाराष्ट्र

बाप-लेकाच्या खून प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे; आरोपींविरोधात १२०० पानांचे दोषारोप पत्र

Murder in Nashik: पोलिसांनी तपास पूर्ण केला असून चौघा संशयितांविरुद्ध १२०० पानांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले आहे.

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक : काही महिन्यांपूर्वी नाशिकमधील पंडित कॉलनी परिसरातील गोपाळ पार्कमधील रहिवाशी मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस (Nanasaheb Kapadnis) आणि त्यांचा मुलगा डॉ. अमित कापडणीस (Amit Kapadnis) यांची निर्घृण हत्या (Brutal murder) करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सरकारवाडा पोलिसांनी पूर्ण केला असून चौघा संशयितांविरुद्ध १२०० पानांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले आहे. मौजमजेसाठी मुख्य संशयित राहुल जगताप याने साथीदार प्रदीप शिरसाठ, सूरज मोरे, विकास हेमके यांच्या मदतीने नानासाहेब आणि डॉ.अमित कापडणीस यांचा खून केला. (Nanasaheb Kapadnis and his son Amit Kapadnis Murder Case In Nashik)

संशयितांनी नानासाहेब कापडणीस यांचा मृतदेह मोखाडा(जि.पालघर) आणि अमितचा मृतदेह राजूर(ता. अकोले, जि. अहमदनगर) येथे नग्नावस्थेत जाळून टाकला. नानासाहेबांच्या मुलीने वडिलांच्या मोबाईलवर कॉल करत संपर्क साधला असता संशयित राहुलने नानासाहेबच बोलत असल्याचा बनाव केला. मात्र, तोच बनाव त्याच्या अंगलट आला. नानासाहेब कापडणीस यांच्या मुलीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात वडील आणि भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला.

तपासात कापडणीस बाप-लेकांचा खून संशयित राहुल जगतापने साथीदारांच्या मदतीने केल्याचे समोर आले. पोलीस तपासात नानासाहेब कापडणीस यांच्या शेअर्स खात्यातून ९० लाखांची रक्कम प्रदीप शिरसाठ याच्या खात्यावर वर्ग झाल्याचे समोर आले. राहुल जगताप हा नानासाहेबांचा मोबाईल वापरत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी नानासाहेबांचा मोबाईल ठाणे येथील खाडीत फेकला.

दरम्यान, दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले होते. पोलिसांनी जगतापच्या लहवित येथील घरातून आणि उंटवाडी, नाशिक येथील सूर्यकिरण सोसायटीमधील फ्लॅटमधून कागदपत्रे, सुमारे १२ लाखांची रक्कम, महागडी कार, पिकअप, कार, नानासाहेबांची दुचाकी आणि दोन्ही पत्नींकडून महागडे मोबाइल जप्त केले. पोलिसांनी फरार तिघांना अटक केली होती. न्यायालयाने संशयित राहुल जगताप यास कोठडी सुनावली. तेंव्हापासून तो कारागृहात आहे. या प्रकरणाची सुनावणी लवकरच सुरु होणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : माजीं खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT