विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा दुर्देवी अंत; बुलडाणा जिल्ह्यातील घटना

Buldhana : अण्णा महादू अवसरमोल (वय ५५) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
Buldhana Farmer Death
Buldhana Farmer DeathSaam Tv

बुलडाणा : शेळ्यांसाठी पाला तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या शेतकऱ्याचा विजेचा शॉक (electric shock) लागून झाडावरच दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना मेहकर (mehkar) तालुक्यातील उटी या गावात घटना घडली. अण्णा महादू अवसरमोल (वय ५५) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अण्णा हे झाडावर चढून पाला तोडत असताना शेजारी असलेल्या रोहित्राच्या तारांना तुटलेल्या फांदीचा स्पर्श झाला. फांदित विद्युत प्रवाह शिरल्याने त्यांना विजेचा जबर धक्का लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. (Farmer Death Due To Electric Shock In Mehkar Buldhana)

Buldhana Farmer Death
ज्या आजीने लाड पुरविला, त्याच आजीच्या जीवावर उठला, सोलापुरातील संतापजनक घटना

मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर तालुक्यातील उटी येथील शेतकरी अण्णा अवसरमोल हे शेतीसह शेळीपालनाचा व्यवसाय करतात. मंगळवारी सकाळी ते गावानजीक असलेल्या उटी शिवारात शेळ्यांना पाला आणण्यासाठी गेले होते. दरम्यान, पाला तोडण्यासाठी ते मोहाच्या झाडावर चढले. पाला तोडत असताना शेजारी असलेल्या रोहित्राच्या तारांना तुटलेल्या फांदीचा स्पर्श झाल्याने फांदित विद्युत प्रवाह शिरला आणि अण्णा यांना विजेचा जबर धक्का लागला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अण्णा यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणी नंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. अण्णा अवसरमोल यांच्या पश्चात पत्नी आणि २ मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे घरातील कर्ताधर्ता व्यक्ती निघून गेल्याने अवसरमोल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com