Nana Patole News Saam tv
महाराष्ट्र

Nana Patole on MVA Sabha: वज्रमुठ सभा होईल की नाही सांगता येत नाही, नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

Nana Patole on Vajramuth Sabha: शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर तिन्ही पक्षामध्ये समन्वय साधने कठीण होईल, अशी शक्यता वर्तवला जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

Nana Patole News : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीवरही त्याचा परिणाम होईल असं बोललं जात आहे. महाविकास आघाडीची वज्रमुठ सैल होईल, अशी विरोधकांकडून टीका होत आहे. शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर तिन्ही पक्षामध्ये समन्वय साधने कठीण होईल, अशी शक्यता वर्तवला जात आहे.

एकीकडे महाविकास आघाडीने राज्यभर वज्रमुठ सभा घेण्याची निर्णय घेतला आहे. मात्र आता यापुढील सभा होतील की नाही याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पुढील पुण्यातील वज्रमुठ सभेबद्दल विचारलं असता, पावसामुळे सभेबाबतचा निर्णय एकत्रित बैठक घेऊन घेतला जाईल असं म्हटलं आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाले नाना पटोले?

राज्यात सध्या विविध ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची याबाबत लवकरच बैठक होईल. याबाबत बैठकीत निर्णय होईल. पुण्यातील वज्रमुठ सभा होईल की नाही याबाबत आताच सांगता येणार नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं.

सुजय विखे पाटलांची टीका

शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमुठ ढीली झाल्याची टीका करत, जयंत पाटील यांनी जे काल वक्तव्य केले आहे त्यावरून तेही राष्ट्रवादी सोडून जातील असं वाटते. शरद पवार यांचा राजीनामा ही पक्षांतर्गत बाब आहे.

जशी समुद्राची वाळू मुठीत घट्ट पकडल्या नंतर ती तितक्याच्या वेगाने ढीली होते. त्या प्रमाणे महाविकास आघाडी वज्रमुठ म्हणजे समुद्रातील वाळू घट्ट धरल्यानंतर जशी हातातून निसटते तसा प्रकार आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आधीच निम्मा कार्यक्रम केला आहे, असं भाजप खासदार विखे पाटील यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Multani Mitti : काळेभोर चमकदार केस हवेत? मग वापरा फक्त मुलतानी माती

सकाळी सकाळी शरीरात दिसणारे 'हे' बदल सांगतात किडनी फेल होतेय

Skin Care: वारंवार फेस क्लिनअप करायची सवय आहे? एकदा जाणून घ्या क्लिनअपचे फायदे आणि नुकसान

Anant Chaturdashi 2025 live updates : उत्तराखंड मधील ‘शिव महिमा’ नृत्य कलाकार ठरले...गणेश मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

SCROLL FOR NEXT