NCP Chief Post: शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण याबाबत चर्चा कालपासूनच सुरु झाली होती. अध्यक्षपदाच्या शर्यतीत अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, प्रुफल्ल पटेल ही चार प्रमुख नावं चर्चेत होती. मात्र सुप्रिया सुळे यांच्याकडे अध्यक्षपद सोपवलं जाण्याची दाट शक्यता असल्याची माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.
शरद पवार यांनी राजीनामा देण्याआधी काही दिवसांपासूनच सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याच्या कागदोपत्री हालचाली सुरु झाल्या होत्या. अजित पवार नॉट रिचेबल झाल्यानंतर या हालचाली सुरु झाल्या होत्या. सुप्रिया सुळे यांच्या कागदपत्रांची तयारी १५ दिवसांपासूनच सुरु झाली होती. (Latest Marathi News)
शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला नाही तर राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे अशी थेट विभागणी पक्षात केली जाण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे यांच्या कागदपत्रांची जुळवाजुळव आधीच झाली होती. लवकरच निवडणूक आयोगाला याबाबत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. आजच्या राष्ट्रवादीच्या बैठकीतच यावर शिक्कामोर्तब केलं जाऊ शकतं.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही याबाबतचे संकेत दिले आहेत. सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला काहीच अडचण नाही. कामाची विभागणी आधीच झाली आहे. राज्यात अजित पवार आणि केंद्रात देशपातळीवरसुप्रिया सुळे अशी विभागणी झाली आहे. त्यांचे लोकसभेत कामआहे. त्यामुळे त्या अध्यक्ष होण्यात अडचण नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.
अनुभव कमी पडला तर शरद पवार आहेतच. शरद पवार यांनी निर्णय बदलला नाही तर निर्णय घ्यावा लागेल. शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.