Supriya Sule Morning Walk: मॉर्निंग वॉकला निघालेल्या सुप्रिया सुळेंना सफाई कर्मचाऱ्याने थांबवलं, अन् विनंती करत म्हटलं...

Sweeper Demands Sharad Pawar should withdraw his Resignation: शरद पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी राहावे हे पक्षाशी संबंधित नसलेल्या अनेकांना वाटत आहे.
Supriya Sule
Supriya SuleSaam Tv

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा काल अचानक राजीनामा दिली. लोक माझे सांगाती या त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान त्यांनी ही मोठी घोषणा केली. दरम्यान या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांना शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयाचा धक्का बसला.

राज्यभर शरद पवारांच्या निर्णयाचे पडसाद उमटले. शरद पवारांच्या निर्णयानंतर सभागृहात काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. राजीनामा मागे घेण्यासाठी पक्षातील सर्वच नेत्यांनी शरद पवारांना विनंती केली. त्यानंतर राज्यभर काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, काही ठिकाणी विनंतीचे बॅनर्स झळकले, तर काहींना राष्ट्रावादीतील आपल्या पदांचा राजीनामा दिला. (Latest Marathi News)

Supriya Sule
IAS Officer Transfer : 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंढेंकडे नवी मोठी जबाबदारी

राष्ट्रवादी पक्षातील नेते, कार्यकर्ते यांच्यासोबत सर्वसामान्य नागरिकांनाही शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयाचा धक्का बसला. शरद पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी राहावे हे पक्षाशी संबंधित नसलेल्या अनेकांना वाटत आहे. याचा प्रातिनिधीक स्वरुपाचा अनुभव राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आला.

Supriya Sule
Sharad Pawar on Belgaum: 'मी न्यू बेळगावचा प्रस्ताव मांडला', कर्नाटक निवडणुकीआधी शरद पवारांचा पुस्तकातून मोठा गौप्यस्फोट

सुप्रिया सुळे आज मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. रस्तावरुन जात असताना एका सफाई कामगाराने त्यांना थांबवलं आणि शरद पवारांनी अध्यक्षपदी कायम राहावं अशी विनंती केली. (Political News)

पवार साहेबांचे विचार हे शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार आहे. मी सर्वसामान्य व्यक्ती आहे. माझी हीच विनंती आहे की पवार साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा, असं सफाई कामगाराने म्हटलं. सुप्रिया सुळेंनी हा व्हिडीओ आपल्या फेसबूक अकाऊंटवर शेअर केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com