Nana Patole spoke clearly
Nana Patole spoke clearly saam tv
महाराष्ट्र

Nana Patole News: हा खेळ तर... महाविकास आघाडीबाबत नाना पटोले जरा स्पष्टच बोलले

Chandrakant Jagtap

>> भूषण शिंदे, साम टीव्ही

Nana Patole Interview : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवारांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. थेट प्रसार माध्यमांशी न बोलता आधी महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली पाहिजे असे म्हणत त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत नाराजीचा सूर आवळाला आहे.

यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील मतमतांतर चव्हाट्यावर आले आहेत. महाविकास आघाडीमध्ये खरंच मतभेद आहेत का? तिन्ही पक्षात दुरावा वाढलाय का? यासंदर्भात थेट महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी साम टीव्हीने संवाद साधला.

"सत्ताधाऱ्यांकडून खेळ खेळला जातो"

महाविकास आघाडी मतमतांतरावर बोलताना नाना पटोले म्हणाले, मुद्दामून अशा प्रकारच्या चर्चा रंगवल्या जातात. सत्ताधारी पक्षांच्या वतीने असा खेळ खेळला जातो. कारण हे सरकार फेल झालेले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा अवकाळी पाऊस असो अशा सर्व विषयांमध्ये हे सरकार फेल झालेले आहे.

महागाई बेरोजगारी सर्वकाही वाढले आहे. सर्वांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे कुठेतरी भाजपा अशी रणनीती खेळते आहे. आमच्यामध्ये कोणतेही मतमतांतर नाहीत, महाविकास आघाडी एकत्र आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

दादांना कदाचित माहित नसेल....

अजित पवार यांच्याबाबत बोलताना पटोले म्हणाले, अजित पवार यांनी काय म्हणावे मला माहित नाही. मी जयंत पाटील यांना सांगितले होते. ते अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपसोबत एकत्र आहेत आणि भाजप विरोधात लढायचे म्हणून आम्ही एकत्र आलो. त्यामुळे खालच्या पातळीवर देखील एकजूट असली पाहिजे. कार्यकर्त्यांमध्ये मनोधैर्य वाढलं पाहिजे.

आज बाजार समितीमध्ये अनेक ठिकाणी ही स्थिती निर्माण झाली. ही गोष्ट अनेक वेळा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सांगितली आहे. ही गोष्ट दादांना कदाचित माहित नसेल. पण जेव्हा भाजपशी लढायचे असेल तेव्हा स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये महाविकास आघाडीची एकजूट असली पाहिजे, असेही ते म्हणाले.

"ठाकरे-पवार भेटले ही बातमी होऊ शकत नाही..."

ठाकरे-पवार भेटले त्यावेळी काँग्रेसचा नेते नव्हते याबाबत विचारल्यानंतर नाना पटोले म्हणाले, मूळ प्रश्न हा आहे की उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील हे भेटले तर ती बातमी होऊ शकत नाही. महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे भरपूर नुकसान झाले आहे.

मोठ्या प्रमाणावर शेतकरी अद्धवस्त झाला आहे. पण सरकार उदासीन आहे. या सरकारच्या अनास्थेची चर्चा होणे गरजेचे आहे. पण आम्ही भेटलो तर चर्चा आणि नाही भेटलो तरीही चर्चा ही बातमी होऊ शकत नाही असे म्हणत त्यांनी प्रश्नाला बगल दिली.

"जेपीसीची का गरजेची हे लोकांना कळले पाहिजे"

नाना पटोले म्हणाले, आज जेपीसी का गरजेचे आहे हे लोकांना कळले पाहिजे. कारण आपण पाहिलं असेल की राजीव गांधी यांच्यावर जेव्हा बोफोर्स बद्दल आरोप झाले, तेव्हा राजीव गांधी यांनी स्वतः पुढाकार घेऊन जेपीसी बसवली आणि दूध का दूध पाणी का पाणी केले. जेपीसी ही खासदारांची असते. स्वतः शरद पवार हे 2003 मध्ये जेपीसीचे अध्यक्ष होते. जेपीसी हे काही नवीन नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AC Tips: उन्हाळ्यात ऐसी वापरताय? सेटिंग करताना 'या' चूका टाळा नाहितर...

SRH vs PBKS: हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी पंजाबने कर्णधार बदलला; या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Chiplun Heavy Rain : भर उन्हाळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; चिपळून, अडरे भागात नद्या झाल्या प्रवाहित

Perfect Apple : बाहेरून मस्त दिसणारा सफरचंद आतून खराब निघतो; वाचा गोड आणि टेस्टी Apple ओळखण्याच्या टिप्स

Tomato Side Effects: या लोकांनी टोमॅटो खाणे आरोग्यासाठी घातक

SCROLL FOR NEXT