Nana Patole Eknath Shinde Saam tv
महाराष्ट्र

Nana Patole News: 'सध्या मुख्यमंत्री आहात याचे भान ठेवा', CM शिंदेंच्या व्हिडिओवरुन नाना पटोलेंचे टीकास्त्र!

Maharashtra Politics Breaking News: पुण्यातील पोर्शे अपघातानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला धारेवर धरले आहे. यावरुनच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सरकारला खडेबोल सुनावलेत. तसेच सध्या सुरू असलेल्या मनुस्मृती श्लोकाबाबतच्या वादावरही त्यांनी सर्वात महत्वाचे विधान केले आहे.

संभाजी थोरात

कराड, ता. ३० मे २०२४

"एकनाथ शिंदेंना नजिकच्या काळात शेतीच करायची आहे. पण सध्या तुम्ही मुख्यमंत्री आहात, याचे भान ठेवा अन् राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भेट द्या' असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला. कराडमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले नाना पटोले?

"मुख्यमंत्री सध्या गावी आलेत. तेथून मी शेतात आहे, असं ट्विट करतात. पण राज्यात दुष्काळ आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. याकडे त्यांनी लक्ष द्यावे. पुन्हा तुम्हाला शेतीच करायची आहे, असा उपरोधिक टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला. तसेच जनतेच्या लोकांच्या प्रश्न मांडले, विचारले की सत्तेवर असलेल्यांना स्टंट वाटत आहे. ही बाब चुकीची आहे," असेही ते यावेळी म्हणाले.

"बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाडले गेले याचे समर्थन कोणीही करणार नाही. पण मनुस्मृती अभ्यासात यावी हा भाजपचा प्रयत्न आहे त्याला काँग्रेस नेहमीच विरोध करेल. अभ्यासक्रमात मनुस्मृती आणून संविधान संपवण्याचा भाजपचा डाव आहे. तो कालबाह्य ग्रंथ आहे," असे महत्वाचे विधानही नाना पटोले यांनी केले.

पुण्यातील पोर्शे अपघातावरुनही नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. गरिबांना रस्त्यावर चालण्याचा अधिकार आता राहिलेला नाही. श्रीमंत लोक, मुले पबमध्ये राहतील तेथून गाडीची रेस लावतील गरीबांना चिरडून टाकतील. आम्ही त्यावर बोललो की सत्ताधाऱ्यांना स्टंट वाटतो, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना धक्का; माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द?

Bigg Boss Marathi Fame Actor : गुलीगत सूरज चव्हाणनंतर बिग बॉस मराठीचा 'हा' अभिनेता चढणार बोहल्यावर; थाटात पार पडलं केळवण, पाहा VIDEO

RBI Jobs: कोणतीही परीक्षा नाही थेट RBI मध्ये नोकरी; मिळणार भरघोस पगार; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Dharashiv : हातात कोयते, गावठी कट्टे आणि हवेत गोळीबार, तुळजापूर राड्यात भाजपा आमदाराच्या पीएच नाव समोर

Maharashtra Corporation Election: महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी, मुंबईतल्या मराठी पट्ट्यासाठी शिंदे सेना आग्रही

SCROLL FOR NEXT