Politics Saam
महाराष्ट्र

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, पण... ठाकरेंच्या बड्या नेत्याचा दावा

Nana Patole offer to Shinde and Ajit Pawar: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. यावर ठाकरे गटाच्या खासदारानं मोठा दावा केलाय.

Bhagyashree Kamble

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोलेंनी महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. तसेच दोघांना मुख्यमंत्री बनवू, असंही पटोले म्हणाले होते. यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोलेंची ऑफर ऐकून 'माझी वाचा गेली, मी यावर काय बोलू शकतो', अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पटोलेंनी शिंदे आणि पवारांना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत म्हणाले, नाना पटोलेंनी दिलेली ऑफर ऐकून माझी वाचा गेली, मी यावर काय बोलू शकतो. नाना पटोले आमचे सहकारी आहेत. ते ज्येष्ठ नेते आहेत. राजकारणात काहीही अशक्य नसतं. राजकारणात सर्व शक्यता असतात. नाना पटोलेंनी ऑफर दिली असेल तर, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू,' असं संजय राऊत म्हणालेत.

एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते- संजय राऊत

'एकनाथ शिंदे तेव्हा काँग्रेसमध्ये जाणार होते. पृथ्वीराज चव्हाण यांना विचारा... अहमद पटेल आता नाहीत. पण एकनाथ शिंदेंची दिल्लीत त्यांच्याशी पहाटे चर्चा झाली होती. हे सर्वात जास्त मला माहिती आहे', असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

एका वृत्तसंस्थेशी बोलताना नाना पटोले म्हणाले, 'अजितदादा अन् एकनाथ शिंदे यांची परिस्थिती खूप वाईट आहे. पक्ष टिकेल की नाही, याची भीती दोन्ही नेत्यांच्या मनात आहे. भाजप त्यांना जगू देत नाहीय. भाजपची ती सवयच आहे. देशात ज्यांच्यासोबत युती केली, त्यांना संपवण्याचं काम भाजपनं केलंय'.

'तत्कानील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना भाजपनं बंद केल्या आहेत. त्यामुळे पवार आणि शिंदेंनी सावध राहावे. आम्ही दोन्ही नेत्यांसोबत आहोत. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना आमच्याकडे बोलवणार आहोत. त्यांना आम्ही पाठिंबा देऊ. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची आस लागलीय. भाजपच्या अधिपत्याखाली दोन्ही नेते मुख्यमंत्री होऊ शकत नाही. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना आलटून -पालटून मुख्यमंत्री बनवून टाकू, आम्ही दोन्ही नेत्यांसोबत आहोत". असं नाना पटोले म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अक्कलकोट तालुक्याला पावसाने झोडपलं

Salman Khan : सलमान खान ऐश्वर्या रायच्या प्रेमात होता वेडा, ब्रेकअपनंतर 'तेरे नाम' गाणं ऐकून ढसाढसा रडायचा

महामार्गावर भीषण अपघात! पहाटे वाहन डिव्हायडरला धडकले; ५ जणांचा मृत्यू, १ गंभीर जखमी

Dhantrayodashi Date : यंदा कधी आहे धनत्रयोदशी, १८ की १९ ऑक्टोबर? जाणून घ्या पूजा, मुहूर्त आणि महत्त्व

Heart Attack: धक्कादायक! भारतातील प्रत्येक तिसऱ्या मुलाला हॉर्ट अ‍ॅटॅकचा धोका, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT