Nana Patole, Satara, NCP, BJP, Prithviraj Chavan
Nana Patole, Satara, NCP, BJP, Prithviraj Chavan saam tv
महाराष्ट्र

Nana Patole News : सरकार किती घाबरतंय बघा, असं का म्हणाले नाना पटाेले ? (पाहा व्हिडिओ)

Siddharth Latkar

- अक्षय बडवे / ओंकार कदम

Satara News : विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही पुणे विद्यापीठात जाणार हाेताे. आत्महत्या हा पर्याय नाही आपल्याला लढायचे आहे, आपल्याला भविष्य उज्जवल करायचे हे सांगण्यासाठी आम्ही उद्या तेथे जाणार हाेताे. परंतु घाबरलेल्या सरकराने तेथे जाण्यास आम्हांला राेखण्यात आले. सरकार किती घाबरत आणि सरकारचा शैक्षणिक संस्थेवर किती दबाव आहे हे आपण पाहू शकतो. पुण्यातील प्रशासनाने आम्हांला प्रवेश नाकरल्याने त्याचा आम्ही निषेध करतो असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी सातारा (Satara) येथे नमूद केले. (Maharashtra News)

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आज (मंगळवार) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साताऱ्यात आले हाेते. रयत शिक्षण संस्था परिसरातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधिस्थळास भेट दिली. तेथे नाना पटोले यांनी अण्णांना अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजप हाच आमचा प्रमुख विराेधक असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले, बेरोजगारी, गरिबी वाढत आहे. या सगळ्या प्रश्नांबाबत आम्ही लक्ष देऊन आहोत. त्यासाठी लढत आहाेत. आघाडी वगैरेकडे आम्ही फारसे लक्ष देत नाही असेही पटाेलेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

SCROLL FOR NEXT