Nana Patole Saam Digital
महाराष्ट्र

Nana Patole : 'अमूल'साठी राज्य सरकारचा खटाटोप; दूध भुकटी आयातीच्या निर्णयावरून नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप

Maharashtra Politics 2024 : राज्य सरकारने दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ अमूलला फायदा मिळवून देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

Sandeep Gawade

महाराष्ट्रात दुधाचा दर सर्वात कमी आहे. तरीही राज्य सरकारने दुधाची भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होऊ नये याची सरकार चांगलीच काळजी घेत आहे. अमूलला कसा फायदा होईल यासाठी हा सगळा खटाटोप असल्याचा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

राज्य आणि केंद्र सरकारचं शेतकरी विरोधी धोरण कायम आहे. सरकार आयात करत असलेल्या दूध भुकटीला आमचा विरोध आहे. दुधाचे दर कमी जास्त करणं राज्य सरकारच्या हातात असतं. अमूल नुकसान करत आहे त्यावर बोलल जात नाही. हे सरकार गुजरात धार्जिणी आहे. मात्र ४० रुपये लिटर दूध मिळावं ही आमची मागणी असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीत हिटलरशाही नाही. प्रत्येक पक्षाला, पक्षातील सदस्यला मत मांडण्याचा अधिकार आहे. मविआत बसू तेव्हा एकत्र जनतेसमोर जाऊ ही भूमिका आहे मोदींनी लोकसभेच्या निवडणुकीवेळी वीज मोफत दिली जाईल, असं आश्वासन दिलं होतं. मात्र सरकार आल्यानंतरही त्याची पुर्तता करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा कार्यकर्त्याचा पार्थिव अहमदपूरमध्ये दाखल, परिसरात हळहळ

VI 5G Plan: व्होडाफोन आयडियाचा ५जी प्लॅन, किंमत किती आणि डेटा फायदे काय?

Gauri Pujan 2025 : गौरी पूजनाचे नियम; कोणत्या नक्षत्रावेळी काय करावे हे जाणून घ्या

पितृपक्षात 'या' गोष्टी दिसणं मानलं जातं शुभं

Maratha Reservation: मुंबई महापालिकेसमोर मराठा आंदोलकांनी फडकवला भगवा झेंडा|VIDEO

SCROLL FOR NEXT