Nana Patole Saam Digital
महाराष्ट्र

Nana Patole : 'हे सरकार कमिशनखोर, शिवपुतळा केवळ दिखाव्यासाठी उभा केला'; नाना पटोले यांचे सरकारवर गंभीर आरोप

Nana Patole On Rajkot Shivaji Maharaj Statue Collapse : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ दिखाव्यासाठी महायुती सरकारने शिवपुतळा उभा केल्याचा आरोप, नाना पटोले यांनी केला आहे.

Sandeep Gawade

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना कोणत्याही वैज्ञानिक पद्धतीचा अलंब करण्यात आलेला नाही. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईत पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटनाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिखाव्यासाठी हे सर्व करण्यात आलं होतं, त्यामुळे हे शिवप्रेमी नसून शिवद्रोही असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

मालवनमधील राजकोट किल्यावर शिवसेना आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाल्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. यावेळी नाना पटोले बोलत होते. या पत्रकार परिषदेत शरद पवार आणि उद्धव ठाकरेही उपस्थित होते. नाना पटोले पुढे म्हणाले की, इडीचा ससेमिरा लागलेले एका नेत्यांनी तर शिवाजी महाराजांचा जिरेटोप नरेंद्र मोदींच्या डोक्यावर घातला, याचा अर्थ असा होती की शिवाजी महाराजांची तुलना दे नरेंद्र मोदींसोबत करत आहेत. हा अधिकार भाजप आणि त्यांच्या साथीदारांना कोणी दिला? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

काल मालवनच्या राजकोटमध्ये जी घटना घडली त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणत आहेत की, यापेक्षा भव्य पुतळा उभारू पण आधीच निकृष्ण दर्जाचं साहित्य वापरून जे पाप यांनी केलं आहे, त्याचं काय? त्यामुळे हे सरकार कमिशनखोर असल्याचा आरोप नानांनी केला. आज महाराष्ट्रात शिंदे सरकारने जे रस्ते बनवलेत ते खड्ड्यांचे रस्ते आहेत. त्यावरून धड चालताही येत नाही. राज्यातील महिला सुरक्षित नाही, आता नवीन जीआर निघणार आहे, की सायंकाळी ७ नंतर मुलींनी घराबाहेर पडायचं नाही. महिला, मुली सुरक्षित नाहीत कारण, सरकार ठोस पावलं उचलत नाही. सरकारने चुका केल्या आहेत.

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ज्या पदावर बसवलं आहे. त्यांना कोणत्या आधारावर या खुर्चीवर बसवलं. दोन वर्षांसाठी बढती दिली आहे. रश्मी शुक्ला या राजकारण करत आहेत. आरएसएसचा अजेंडा चालवत असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT