Nana Patole Saam tv
महाराष्ट्र

Nana Patole Car Accident: नाना पटोले यांच्या कार अपघातप्रकरणी मोठी अपडेट; ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात

Nana Patole Car Accident Update: मंगळवारी रात्री भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ नाना पटोलेंच्या कारचा अपघात झाला होता. प्रचार आटोपून सुकळी गावाच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली.

Ruchika Jadhav

Truck driver in police custody :

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अपघाताबाबत मोठी बातमी समोर आली आहे. नाना पटोलेंच्या कारला धडक देणारा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच ट्रक चालकाला देखील अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

गोवर्धन कुसरामला असं ट्रक चालकाचं नाव आहे. अपघातानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर घातपात घडवण्याता प्रयत्न झाला असा आरोपही करण्यात आला होता. अशात आता ट्रक चालकाला अटक केल्यानंतर पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

मंगळवारी रात्री भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ नाना पटोलेंच्या कारचा अपघात झाला होता. प्रचार आटोपून सुकळी गावाच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. सुदैवाने या अपघातामध्ये नाना पटोले थोडक्यामध्ये बचावले.

नाना पटोलेंची प्रतिक्रिया

'अपघात की घातपात? पोलीस तपासानंतर सत्य समोर येईल', अपघातानंतर नाना पटोलेंची अशी प्रतिक्रिया दिली आहे. पोलीसांच्या तपासानंतर सत्य काय आहे ते बाहेर येणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. अपघातासंदर्भात नाना पटोले यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.

काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यात हा अपघात झाल्याने अपघाताप्रकरणी काँग्रेसने थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसने चौकशीची मागणी केली आहे. कारला झालेला अपघात हा निव्वळ अपघात होता की कट याची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal-Budh Yuti: मकर संक्रातीनंतर होणार मंगळ-बुधाची होणार युती; या राशींच्या नशीबी येणार पैसाच पैसा

Baba Mondkar : भाजपला मोठा धक्का! ऐन निवडणुकीत बड्या नेत्याचा तडकाफडकी पदाचा राजीनामा

पत्नीने लेकीचा ताबा मागितला; रागाच्या भरात नवऱ्याने ८ वर्षीय मुलीला संपवलं, नागपुरात खळबळ

Maharashtra Live News Update: कराडच्या कृष्णा पुलावरून उडी मारून महिलेचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

Jio New Recharge Plan: Jio ग्राहकांसाठी खुशखबर; डेटा, कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा फक्त 75 रुपयांत

SCROLL FOR NEXT