Nana Patole Saam TV
महाराष्ट्र

Nana Patole: विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार का? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेसाठी महाविकास आघाडीतील पक्षांनी तयारी सुरु केली आहे. उद्धव ठाकरे यांनी २८८ विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक घेतली. त्यांना विधानभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, शरद पवार गट काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचदम्यान, विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसचे नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नाना पटोले यांनी नागपुरात राज्यातील विविध घडामोडींविषयी माध्यमांशी संवाद साधला. नाना पटोले आगामी निवडणुकीबाबत म्हणाले की, आम्हाला सत्ता मिळेल की नाही हा विषय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी खालच्या स्तरावर जाऊन घर फोडत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी एकजूट महत्वाची आहे. आम्ही मागच्या वेळी लढलो. २८८ जागांवर संघटनात्मक काम सुरु आहे. यात आपल्या सहकाऱ्यांना फायदा व्हावा हा उद्देश आहे'.

छगन भुजबळ यांच्या नाराजीवर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले, 'भाजपच्या सानिध्यात असणारा ओबीसी चेहरा असेल तर त्याला लक्ष्य केले जाते. ओबीसी मतांचा वापर करण्याचं काम भाजप करत आहे. भुजबळांना त्रास आहे. भाजपने त्यांना तुरुंगात टाकलं होतं'.

खासदार प्रतिभा धानोरदार यांच्या खळबळजनक दाव्यावर बोलतना पटोले म्हणाले, खासदार धानोरकर काय म्हणाल्या मला माहीत नाही. खासदार तिकीट वाटतात, असं म्हणणे चुकीचं आहे,तिकीट हायकमांड वाटते. खासदार शिफारस आणि मत मांडू शकतात. काँग्रेस पक्षात लोकशाही आहे. नुकसान आणि फायदा नंतरचा भाग आहे. लोकशाहीने पक्ष चालला आहे. हे महत्वाचं आहे'.

स्मार्ट मीटर कंत्राटदारावर नाना पटोले काय म्हणाले?

'स्मार्ट मीटर कंत्राटदाराचे पोट भरून गरीब माणसाला अंधारात ठेवणारी योजना आहे. नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार जनतेला अंधारात घालण्याचं काम सुरू आहे. नीटमध्ये काय झालं, सर्वांनी पाहिलं. हे हुकशाही सरकार आहे. सत्तेतून हकालपट्टी हाच एकमेव कार्यक्रम आहे, असे पटोले म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांचा पुन्हा होणार खोळंबा, आज रेल्वेच्या या मार्गावर ब्लॉक; अनेक लोकल रद्द

Weather Alert : मुंबई, कोकणासह विदर्भातील १८ जिल्ह्यांत आज तुफान पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Numerology : या तारखेला जन्मलेले व्यक्ती असतात धोरणी अन् हुशार; तुमचा भाग्यांक कोणता? जाणून घ्या...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, या राशीच्या व्यक्तींच्या मनातील इच्छा होणार पूर्ण; फक्त कर्म चांगले ठेवा

Horoscope Today : कोणाच्या राशीत आज काय? वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT