Raj Thackeray: उद्धव ठाकरेंना मिळालेली मतं मराठी लोकांची नव्हती, मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंनी नेमकं काय सांगितलं?

Raj Thackeray Criticized Uddhav Thackeray In MNS Meeting: मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. लोकसभेत उद्धव ठाकरेंना मिळालेली मतं मराठा समाजाची नसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
राज ठाकरे
Raj ThackeraySaam Tv
Published On

वैदेही कानेकर, साम टीव्ही मुंबई

मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना मिळालेली मतं ही मराठी लोकांची नव्हती, असं वक्तव्य केलं आहे. मुस्लिम समाजाने मतदान केलं, ते केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी यांच्या विरोधात होत, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात जातीय राजकारण बघायला मिळालं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला निश्चितच धक्का लागल्याची टीका देखील राज ठाकरेंनी केली आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राजकारण हे अतिशय विकोपाला गेलं आहे. जात आणि समाज या मुद्द्यांवर आधारित मोठ्या प्रमाणात मतदान लोकसभेला झालं आहे, ते अत्यंत हानिकारक असल्याचं राज ठाकरेंनी बैठकीत म्हटलं (Maharashtra Politics) आहे. आपल्याला आगामी निवडणुकीमध्ये २५० आणि कमीत कमी २२५ जागा लोकसभेला उतरवायचे आहेत. मात्र, या राजकारणामध्ये कुठेही धार्मिक आणि जातीयवाद नसला पाहिजे, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) पुढेही म्हणाले की, महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण झालं ते योग्य नाही. महाविकास आघाडीसोबत उद्धव ठाकरे गेल्यामुळे लोकांचा एक वेगळा राग होता. त्यानंतर ४० आमदारांनी शिवसेनेतून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चिन्ह आणि पक्षाचे नाव यावरून ज्या पद्धतीचं राजकारण झालं, त्यामुळे पुन्हा एकदा लोकांची भावना ही उद्धव ठाकरेंसोबत गेल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं (Uddhav Thackeray) आहे.

राज ठाकरे
Raj Thackeray News: वरळीत आदित्य ठाकरे वि. मनसेचे संदीप देशपांडे? मनसेकडून 20 जागांची मागणी?

त्यावेळेस बाळासाहेबांच्या भावनिक असलेल्या गोष्टी म्हणजेच पक्षाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव या गोष्टींना शिंदेंनी हात लावला. त्यामुळे लोकांची सहानभूती पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे गेल्याचं राज ठाकरेंनी बैठकीत (MNS Meeting For Assembly Election) सांगितलं. शरद पवार यांनी ओबीसी, मराठा असं राजकारण केलेले दिसून आलेलं आहे. ते महाराष्ट्राच्या जनतेलाही पटलेलं नसल्याची टीका राज ठाकरेंनी आज मनसेच्या बैठकीत केली आहे.

राज ठाकरे
Raj Thackeray : मनसे विधानसभा स्वबळावर लढण्याच्या तयारीत? राज ठाकरे महायुतीतून बाहेर पडणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com