Namo Shetkari Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

Namo Shetkari Yojana 8th Installment Update: राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा झाला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही ऑनलाइन पद्धतीने चेक करा.

Siddhi Hande

राज्य सरकारची नमो शेतकरी योजना

शेतकऱ्यांच्या खात्यात ८वा हप्ता खात्यात जमा

तुम्हाला पैसे आले की नाही, असं करा चेक

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी खास नमो शेतकरी योजना राबवली आहे. नमो शेतकरी योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. नमो शेतकरी योजनेत आतापर्यंत शेतकऱ्यांना ८ हप्ते देण्यात आले आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आठवा हप्ता नुकताच देण्यात आला. दरम्यान, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी ८९ लाख ७४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक २००० रुपये जमा केले आहेत. यासाठी १७९८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. हा हप्ता मार्च महिन्यात जमा झाला आहेत. या योजनेत तुम्हाला पैसे मिळाले की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

असा चेक करा स्टेट्‍स (Namo Shekari Yojana Status)

नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन स्टेट्‍स चेक करायचा आहे.

या योजनेसाठी https://nsmny.mahait.org/ वेबसाइटवर जा.

यानंतर तुम्हाला बेनिफिअरी स्टेट्सवर क्लिक करा.

त्यावर तुम्ही मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकावा.

यानंतर कॅप्चा कोड भरा.

यानंतर मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकावा. यानंतर सबमिटवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला तुमच्या हप्त्याबाबत माहिती मिळणार आहे. तुमचा स्टेट्‍स तुम्हाला दिसणार आहे.

पैसे जमा झाले की नाही हे तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने कळणार आहे. तुमच्या बँकेत पैसे जमा झाल्यावर लगेच मेसेज येणार आहे. तुम्ही तुमच्या अधिकृत अॅप किंवा वेबसाइटवर जाऊन पैसे आले की नाही चेक करु शकतात.याचसोबत तुम्ही बँकेत जाऊन तुम्ही पासबुकवर एन्ट्री करु शकतात. त्यावरुन पैसे आले की नाही हे समजणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aishwarya Rai: विश्वसुंदरी ऐश्वर्या रायने गाजवला कान्सचा शेवटचा दिवशी, पांढऱ्या सूटमधील रॉयल लूक व्हायरल

Maharashtra News Live Update: बीडमध्ये केज तालुक्यातील जिवाचीवाडी शिवारात रात्री झालेल्या गारपिटीसह वादळी वाऱ्याने शेती पिकांचे नुकसान

Yavatmal Heat Wave: यवतमाळमध्ये उष्णतेची लाट; ४८ तासात जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू

पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार; राहुल गांधींचा खळबळजनक दावा|VIDEO

Child Eye Care: लहान मुलांना जेवताना मोबाईल देताय? भविष्यात होऊ शकतात मोठे परिणाम, तज्ञांचा गंभीर इशारा

SCROLL FOR NEXT