Manasvi Choudhary
प्रेग्नंट असणं म्हणजेच'आपण आई होणार' हे प्रत्येक महिलेसाठी अत्यंत खास असते.
विवाहित महिलांची पाळी चुकली की त्या प्रेग्नंट आहेत असे समजतात आणि प्रेग्नंसी टेस्ट करतात.
मात्र यानंतर देखील त्यांना आपण प्रेग्नंट आहे की नाही, हे समजत नाही. त्यामुळे प्रेग्नंट असण्यामागची नेमकी लक्षणे कोणती आहेत ती कशी ओळखायची हे या वेबस्टोरीतून थोडक्यात जाणून घेऊया.
साधारण मासिक पाळीची तारीख चुकून महिना झाला असेल तर प्रेग्नंट असल्याची चिन्हे दिसू लागतात.
प्रेग्नंट असताना शरीरात हार्मोनल बदल होऊ लागतात यामुळे योनीतून स्राव होऊ शकतो. तसेच योनीमार्गात दुखणे, जळजळ किंवा उग्र वास येत असेल तर हे देखील लक्षण आहे.
जेव्हा स्री प्रेग्नंसीच्या काळात असत तेव्हा स्तनामध्येही बदल दिसू लागतात. स्तनामध्ये जडपणा, मुंग्या येणे किंवा स्पर्श केल्यावर वेदना देखील होतात.
थकवा, अन्नाचा वास न येणे किंवा कोणत्याही वासाने मळमळणे, पोटाच्या समस्या जाणवणे, उलट्या होणे हि प्रेग्नंट असल्याची मुख्य लक्षणे आहेत.
मॉर्निग सिकनेस हे प्रेग्नंट असल्याचं लक्षण आहे. मासिक पाळी चुकल्यानंतर हे लक्षण दिसून येते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या