Nalasopara News Saam tv
महाराष्ट्र

Nalasopara News : तब्बल २५ महिलांशी लग्न करत पैसेही उकळले; अखेर सापडला पोलिसांच्या ताब्यात

Nalasopara News : २०१५ मध्ये पुण्यातील ४ महिलांना हेरून लग्न केले. त्यानंतर तो २०२३ मध्ये ६ वेळा तुरुंगात जाऊन आला. मात्र त्यानंतरही त्याने फसवणूक सुरू ठेवत तब्बल २५ महिलांशी लग्न करत त्यांच्याकडून पैसे उकळले

Rajesh Sonwane

महेंद्र वानखेडे

नालासोपारा : अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना फसवून लग्न करणे हेच त्याचे काम. असे करत एक- दोन नव्हे, तर तब्बल २५ वेळा लग्न केले आणि या सर्व पत्नींना अक्षरशः लाखो रुपयांत गंडवले आहे. यातील एक लग्नाची बेडी मात्र त्याला गजाआड होण्यास कारणीभूत ठरली असून नालासोपारा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 

फिरोज नियाज शेख (वय ४३) असे पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. फिरोज याने पुण्यातील ४ महिलांशी लग्न केले असून ६ वेळा जेलमध्ये जाऊन आला आहे. फिरोज नियाज शेख याने २०१५ मध्ये पुण्यातील ४ महिलांना हेरून लग्न केले. त्यानंतर तो २०२३ मध्ये ६ वेळा तुरुंगात जाऊन आला. मात्र (Nalasopara News) त्यानंतरही त्याने फसवणूक सुरू ठेवत तब्बल २५ महिलांशी लग्न करत त्यांच्याकडून पैसे उकळले आहे. दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळताच त्याला बेड्या ठोकून पोलिसांनी त्याची वरातच काढली. 

पोलिसांनी फेक प्रोफाइल बनवून पकडले 

फिरोज नियाज शेखने एका लग्न (Marriage) जमवणाऱ्या संकेतस्थळावरून एका महिलेशी ओळख वाढवली. तिच्याशी लग्न केले. त्यानंतर तिच्याकडून लॅपटॉप व कार घेण्यासाठी ६ लाख ५० हजार ७९० रुपये घेऊन तो पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या महिलेने नालासोपारा पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी फिरोजचा शोध सुरू केला. मात्र त्याचा नंबर नसल्याने पोलिसांना सापडत नव्हता. पोलिसांनी एक फेक महिलेची प्रोफाईल बनवून महिलेला भेटायला बोलावले. तो कल्याणमध्ये असल्याची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Manikrao Kokate: राजीनाम्याऐवजी माणिकराव कोकाटेंचं खातेबदल होणार? अजित पवारांची नाराजी

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, ३ राष्ट्रीय महामार्गांवरील उपाययोजना ठरतील रामबाण

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Raksha Bandhan 2025: भावाला चांदीची राखी बांधल्याने काय फायदे होतात?

SCROLL FOR NEXT