Nalasopara News Saam tv
महाराष्ट्र

Nalasopara News: चोरांना पकडण्यासाठी लोखंडी ग्रीलला लावले करंट; पुढे घडले ते भयंकर, होत्‍याचे नव्‍हते झाले

चोरांना पकडण्यासाठी लोखंडी ग्रीलला लावले करंट; होत्‍याचे नव्‍हते झाले, घडले भयंकर

चेतन इंगळे

नालासोपारा : दुकानात चोरी होवू नये; याकरीता चोरांना पकडण्यासाठी एका महिलेने चक्क लोखंडी ग्रीलमध्‍ये विद्युत प्रवाह (Electric Shock) सोडला होता. परंतु, चोर तर नाही अडकला मात्र ग्रीलला लावलेल्या करंटमध्ये १८ वर्षीय मुलाचा मृत्यू (Death) झाल्‍याची घटना घडली आहे. (Maharashtra News)

नालासोपारा पुर्वेकडील मोरेगांव येथे राजाराम अपार्टमेंट शॉप नंबर ३ येथील राहणाऱ्या आरोपी मिरा संजय कांदु या महिलेचे दुकान आहे. रात्रीच्‍या वेळी दुकानात चोर शिरु नये; यासाठी महिलेने बाथरुममधील खिडकीच्या लोखंडी ग्रीलला चक्क इलेक्ट्रीक करंट लावून ठेवले होते. या खिडकीला हात लागल्याने राकेश नरेंद्र शिंदे (वय १८) या मुलाचा दुदैवी मृत्यू झाला आहे.

महिलेवर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा

राकेशच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्‍या मिरा कांदु या महिलेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल तुळींज पोलिसांनी केला आहे. सध्या आरोपीला महिलेला नोटीस पाठवून तिला वसई न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Maharashtra Live News Update : नगरमध्ये शिवशक्ती- भीमशक्तीचा आज जनआक्रोश मोर्चा

कोरोनानंतर 'फ्लू'नं डोकं वर काढलं, 'या' देशातील शाळा अन् डे-केअर सेंटर्स बंद; लॉकडाऊन लागणार?

बहिणीकडे निघालेल्या मुलीला रस्त्यात गाठलं, ५ जणांनी केला सामूहिक बलात्कार, एकाचा एनकाऊंटर, ३ जणांच्या मुसक्या आवळल्या

Box Office Collection: 'कांतारा: चॅप्टर १' ची बॉक्स ऑफिसवर तुफान क्रेझ; पार केला ४०० कोटींचा टप्पा

SCROLL FOR NEXT