नालासोपाऱ्यात कोट्यवधींचा गंडा घालणारी बंटी-बबलीची जोडी जेरबंद! saamtv
महाराष्ट्र

नालासोपाऱ्यात कोट्यवधींचा गंडा घालणारी बंटी-बबलीची जोडी जेरबंद!

मनसेच्या कार्यकर्त्यांनी सापळा लावून, तोंडाला काळे फासून पोलिसांच्या स्वाधीन केले.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई/विरार : तुम्ही आतापर्यंत गंडा घालणारे अनेक बंटी बबली पहिले असतील. परंतु, आरबीआय च लेटर दाखवून व वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून कोट्यवधींचा गंडा घालणारे बंटी बबली पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. नालासोपाऱ्यातील या भामट्यांचा पर्दाफाश पोलिसांनी केलाय. नालासोपाऱ्यातील सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपादन करून त्यांनी आता पर्यंत अनेकांकडून लाखो रुपये घेतले.

हे देखील पहा :

आता या भामट्यांची मोडस ऑपरेंडी कशी होती तेही वाचा... नालासोपाऱ्यातील महिलांना रिझर्व बँकेत आमचा फंड आला असून ते सोडवण्यासाठी पैश्यांची गरज असल्याच्या थापा मारायचे. तुम्ही पैसे दिल्यास रिझर्व बँकेकडून फंड घेता येईल अशी बतावणी हे दोघे करत होते. त्याबदल्यात1 BHK फ्लॅट देण्याचे आमिष हे दोघे द्यायचे.

काही महिलांनी स्वतःचे दागिने गहाण ठेवून या भामट्यांना लाखो रुपये दिले. मात्र, पैसे परत करण्याची वेळ आल्यावर हे बंटी बबली फरार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलांनी आचोळे पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, पोलिसांनी पिडीत महिलांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांनाच दमदाटी करून पोलीस ठाण्यातून हुसकावून लावले. अखेर पिडीत महिलांनी मनसे कडे धाव घेवून कैफियत मांडली.

मनसेच्या रवी पाटेकर यांनी पुढाकार घेऊन राजकुमार पुजारीला शोधून काढलं. पिडीत महिलांनी राजकुमारला चांगला चोप दिला. राजकुमार पुजारी स्वतःला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकारचा वरिष्ठ अधिकारी असल्याच्या थापा मारीत होता. मात्र, त्याला त्याच्या पोस्ट विषयी विचारल्यावर त्याची बोबडी वळली. पिडीत महिलांची बोगस अधिकाऱ्याविरोधात आचोळे पोलिसांनी साधी तक्रार घेण्यास नकार दिला.

उलट आम्हाला विचारून पैसे दिले होते का असा उद्धट सवाल पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी विचारल्याचा आरोप या फसवणूक झालेल्या महिलांनी केला आहे. त्यामुळे पोलिसच असे वागत असतील तर सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार असा सवाल पिडीत महिलांनी विचारला आहे. मात्र, कॅमेरा समोर बोलण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Love Letter: कामाच्या वेळेत दडलेलं, मनात वाढलेलं न बोललेलं प्रेम, ऑफीसच्या नाहीतर मनाच्या पत्त्यावर पाठवलेलं पत्र

Zodiac signs: ११ जानेवारीचा दिवस कसा असेल? पंचांगानुसार चार राशींना अनुकूलता

Kriti Sanon Sister: नुपूर आणि स्टेबिन अडकले विवाहबंधनात; बहिणीच्या लग्नात क्रिती सॅननला अश्रू अनावर

Maharashtra Live News Update : आज ठाकरे बंधू यांची जाहीर सभा शिवाजी पार्कवर होणार

Maharashtra Politics: राजकीय वाद पेटला! शिंदेंच्या नेत्याच्या घरावर हल्ला, दगडफेक करत कार जाळण्याचा प्रयत्न; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT