-- संजय राठोड
यवतमाळ - अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डब्ल्यू. चव्हाण यांनी दिला. शेख शारीक शेख रहिम (वय 25,रा. कळंब चौक), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सहा फेब्रुवारी 2017 रोजी सतरा वर्षाची अल्पवयीन मुलगी कॉलेजला गेली असता, तिला जबरदस्तीने आर्णी येथे उर्स बघण्याच्या उद्देशाने आरोपी घेऊन गेला.
हे देखील पहा :
वाहन पार्कींगमध्ये नेऊन त्याने या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यानंतर नागपूर येथे तिला नेण्यात आले. दोघेही नागपूर येथील बसस्थानकावर उतरले असता, त्यांना या तरुणीच्या चुलत बहिण व वहिनीने पोलिसांच्या मदतीने पकडले. यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात आणून या तरुणाविरुद्घ गुन्हा नोंदवण्यात आला होता.
हे प्रकरण प्रकरण न्यायप्रविष्ट होते. यात एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. कलम 4 बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्याप्रमाणे दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा, कलम 363 भांदवीअंतर्गत दोन वर्षे सक्त मजुरी व दोन हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील नीती दवे यांनी काम पाहिले.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.