crime news , amravati , chandur railway, police , minor girl saam tv
महाराष्ट्र

Amravati : आई, बहिणींसमाेर मुलींना पळवून नेणा-या नईमचा काेणी केला गेम ?

नईमचा अज्ञातांनी खून केल्याची घटना घडली. यावरून शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांवरील आव्हान वाढल्याचे दिसून येत आहे.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Chandur Railway : तीन दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील कुख्यात गुंड नइम याने अल्पवयीन मुलीला (girl) पळवून नेण्याची घटना घडली होती. आता या घटनेला वेगळे वळण लागलं असून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला घरी सोडल्यानंतर नइम खान याचा खून झाला. खान याची गुन्हेगारी पार्श्वभुमी असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या घटनेचा अधिक तपास पाेलीस (police) करीत आहेत. (chandur railway station news)

याबाबत मिळालेली माहिती अशी : पळवून नेलेल्या एका अल्पवयीन मुलीला घरी परत आणून देण्यासाठी काल गारुडी पुरा परिसरातील लोकांनी पोलीस स्टेशनला 24 तासाचे अलटीमेटम दिला हाेता. यावेळी शेकडो नागरिकांनी पोलिस स्टेशनला घेरलं हाेते.

खानची दहशत संपली

गुंड नईम खान हा चांदूर रेल्वे शहरातील गारुडी पुरा, शिवाजीनगर सह अनेकांची डोकेदुखी ठरत होता. अनेक बेकायदेशीर कामे त्याच्याकडून व त्याच्या साथीदारांकडुन केली जात असे. काहींची पाेलिसांत नाेंद हाेत असे काही जण घाबरुन पाेलीसांत जात नसे.

दाेन दिवसांपुर्वी खानने परिसरातीलच एका अल्पवयीन मुलीला तिच्या आई व बहिणीला चाकूचा धाक दाखवून जबरीने फिल्मस्टाईल पळवून नेले होते. त्यामुळं परिसरात पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण झाले हाेते. परंतु नागरिकांनी एकत्रित येऊन लढा देण्याचा निर्णय घेतला.

खानला अटक करून मुलीला परत आणून द्यावे यासाठी गुरुवारी परिसरातील शेकडो नागरिकांनी पोलीस ठाणे गाठलं. यावेळी नागरिकांनी पाेलिस ठाण्याला वेढा घातला. यावेळी पोलिसांनी नागरिकांना आश्वासित करुन तपास सुरू केला. दरम्यान मध्यरात्री खानचा खून झाला. या घटनेची माहिती शहरात आज सकाळी वा-या सारखी पसरली. खान याचा अज्ञातांनी खून केल्याची नाेंद तूर्तास पोलिसांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, पुरात जीप वाहून गेल्याने ६ जण अडकले

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

SCROLL FOR NEXT