महाराष्ट्र

नागवडे साखर कारखाना उच्चांकी दर देणार

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : साखर कारखानदारी अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. मात्र, सभासद हा कारखान्याचा मालक आणि कामगार आत्मा आहे. विकासरथाची ही दोन्ही चाके महत्वाची असल्याने आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो, असे सांगत अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी नागवडे साखर कारखाना जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकांचा ऊसाला भाव देणार असल्याची घोषणा केली.

नागवडे कारखान्याचा ४७ व्या गाळप हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांचे हस्ते झाले. यावेळी जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे नूतन अध्यक्ष अविनाश निंभोरे यांचा सत्कार करण्यात आला.

अध्यक्षस्थानावरून बोलताना नागवडे म्हणाले, की या गाळप हंगामासाठी नऊ लाख मे. टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला नागवडे साखर प्राधान्याने घालावा. सगळ्यांचा ऊस नेण्यास आपण समर्थ आल्याने ऊस घालताना घाई करू नये. Nagwade Sugar Factory will pay higher rates

साखरेच्या भावात सारखा चढ-उतार होतो. जुनी साखर कमी भावाने विकावी लागते. लवकरच इथेनॉलनिर्मिती प्रकल्पाचे काम हाती घ्यावे लागणार असल्याचेही ते म्हणाले. बाबासाहेब भोस म्हणाले, की नागवडे साखर कारखाना भविष्यात सक्षमपणे चालण्यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून कारखान्याकडे पाहावे लागेल.

कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशवराव मगर म्हणाले, नागवडे साखर कारखान्याला ऊस घालणे आवश्यक तरच ऊसाला चांगला भाव देता येईल. भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे कुकडी पाटपाणी कृती समितीचे समन्वयक राजेंद्र म्हस्के यांचीही भाषणे झाली.

प्रास्ताविक सुभाष शिंदे यांनी केले. जिल्हा बॅकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, बाबासाहेब इथापे, आण्णासाहेब शेलार,जिजाबापू शिंदे, योगेश भोयटे, प्रेमराज भोयटे, सतीश मखरे, प्रशांत गोरे, शुभांगी सुर्यवंशी, आदेश नागवडे उपस्थितीत होते. संचालक शरद खोमणे यांनी आभार मानले.Nagwade Sugar Factory will pay higher rates

आरोपांच्या तोफांचा नुसता भडीमार नको - पंधरकर महाराज

प्रकाश महाराज पंधरकर म्हणाले, स्वर्गीय बापूंनी हा सहकारातील मजबूत किल्ला पुढच्या अनेक पिढ्यांसाठी करून ठेवला आहे. येथे राजकारण थोडे बाजूला ठेवा आणि एकत्रित शेतकऱ्यांचे कल्याण करा. नुसता राजकीय आरोपांचा भडिमार व्हायला नको.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

SCROLL FOR NEXT