Nagpur Pune Vande Bharat Saam Tv
महाराष्ट्र

प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर - पुणे वंदे भारतबाबत रेल्वे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Nagpur–Pune Vande Bharat Express: नागपूर–पुणे वंदे भारत एक्स्प्रेस २ दिवसांत १८.६ लाखांची कमाई. सुरूवातीच्या आठवड्यातच प्रतीक्षा यादी लागलेली देशातील पहिली वंदे भारत.

Bhagyashree Kamble

  • नागपूर–पुणे वंदे भारत एक्स्प्रेस २ दिवसांत १८.६ लाखांची कमाई.

  • सुरूवातीच्या आठवड्यातच प्रतीक्षा यादी लागलेली देशातील पहिली वंदे भारत.

  • खुर्चीयानचे भाडे ₹2020 तर आरामदायी आसन व्यवस्थेचे भाडे ₹3080.

  • रेल्वे अधिकाऱ्यांकडून डबे वाढवण्याचा गंभीर विचार सुरू.

मनमाडमार्गे धावणारी नागपूर–पुणे वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. देशभरात धावणाऱ्या १३० वंदे भारतांपैकी ही गाडी पहिल्याच दोन दिवसांत प्रतीक्षा यादीत पोहोचणारी ठरली असून, तिने तब्बल १८ लाख ६० हजार ७१२ रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. सुरूवातीच्या २ दिवसातच प्रतिक्षा यादी गाठणारी ही भारतातील पहिली वंदे भारत ठरली.

सध्या या गाडीत खुर्चीयानचे ८ डबे व एक विशेष आरामदायी बैठक व्यवस्था असलेला डबा असून, एकूण ५३० प्रवाशांची क्षमता आहे. खुर्चीयानसाठी २०२० रुपये तर, आरामदायी आसन व्यवस्थेसाठी ३०८० रुपये इतके भाडे निश्चित केले आहे. अवघ्या १२ तासांत प्रवास पूर्ण होत असल्याने प्रवाशांची ही पहिली पसंती ठरत आहे. ही वंदे एक्स्प्रेस नागपूरहून सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी सुटते. तर, रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी पुण्यात पोहोचते.

तर, हीच वंदे भारत एक्स्प्रेस पुण्याहून सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी सुटते तर, सायंकाळी अजनी येथे ६ वाजून २५ मिनिटात पोहोचते. अवघ्या बारा तासांत आपला प्रवास होतो. त्यामुळे प्रवाशांची ही वंदे भारत एक्स्प्रेस पहिली पसंती आहे. या वंदे भारत एक्स्प्रेसची सुरूवात ११ ऑगस्ट रोजी झाली होती. दोन दिवसांत या एक्स्प्रेसनं १८ लाक ६० हजार ७१२ रूपयांची कमाई मध्य रेल्वेला करून दिली होती.

नागपूर - पुणे वंदे एक्स्प्रेसला मिळालेल्या प्रतिसादामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी या एक्स्प्रेसचे डबे वाढवून अधिक प्रवासी क्षमता करण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे.

प्रतीक्षा यादी (वंदे भारत क्र. २६१०२ – अजनी–पुणे)

१५ ऑगस्ट : खुर्चीयान – १६, आरामदायी आसन – २

१६ ऑगस्ट : खुर्चीयान – ४७, आरामदायी आसन – ४

१७ ऑगस्ट : खुर्चीयान – ११४, आरामदायी आसन – १९

आरामदायी आसन व्यवस्थेसाठी १९ अशी प्रतिक्षा यादी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना आमदाराच्या पत्नीसमोर चित्रलेखा पाटील म्हणाल्या ५० खोके...; सुरूवातीला बाचाबाची नंतर धक्काबुक्की; VIDEO व्हायरल

Ban Online Betting Games: मोदी सरकारचा आणखी एक स्ट्राईक; ऑनलाइन बेटिंग गेम्सवर आणणार बंदी

Crime: दारूच्या नशेत बायकोवर कुऱ्हाडीने वार, नंतर धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या; जळगाव हादरले

Maharashtra Rain: राज्यात पावसाचे धुमशान! रेल्वेसेवेला मोठा फटका, २०-२१ ऑगस्टला लांबपल्ल्याच्या ट्रेन्स रद्द; वाचा लिस्ट

Maharashtra Rain Live News: मुंबईसाठी उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट, शाळां-महाविद्यालयांच्या सुट्टीबाबत अद्याप निर्णय नाही: BMC

SCROLL FOR NEXT