Crime News Saam Tv
महाराष्ट्र

बँकेत चला, लस घेतली कि पैसे मिळतात असे सांगून ६५ वर्षीय महिलेचे दागिने लुटले

"लस घेतली तर पैसे मिळतात, तुम्ही माझ्या सोबत बँकेत चला" असे ताराबाई यांना सांगून बँकेकडे नेण्याच्या बहाण्याने ऑटो रिक्षात बसवण्यात आले.

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरच्या शांती नगर पोलीस स्टेशन हद्दीत एका 65 वर्षीय महिलेची फसवणूक झाली आहे. ताराबाई हेडाऊ असे फसवणूक झालेल्या महिलेच नाव आहे. ताराबाई या शांती नगर परिसरातील बाजारात गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांना एक साधारणतः 35 वर्षीय महिला भेटली तिने ताराबाई यांना तुम्ही कोरोनाची लस (Corona Vaccine) घेतली का? असे विचारलं असता त्यांनी होकार दिला.

हे देखील पहा :

मग त्या महिलेने "लस घेतली तर पैसे मिळतात, तुम्ही माझ्या सोबत बँकेत चला" असे ताराबाई यांना सांगून बँकेकडे (Bank) नेण्याच्या बहाण्याने ऑटो रिक्षात बसवण्यात आले. ताराबाई यांचा विश्वास संपादन करून त्यांना आपणास कर्ज पाहिजे का असेही विचारण्यात आले. तेव्हा कर्ज हवे असल्याचे ताराबाई यांनी हो म्हणताच कानातील सोन्याचे दागिने द्या कर्ज मिळवून देते असे आरोपी महिलेने सांगितले.

ताराबाई यांनी देखील दागिने काढून दिले. कानातील दागिने घेऊन ताराबाईंना बँकेच्या बाहेर उभे राहण्यास सांगण्यात आले. स्वतः बँकेत जात असल्याच दाखवून या अज्ञात महिलेने तिथून पळ काढला. ताराबाई यांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करून फसवणूक करणाऱ्या महिलेचा शोध सुरू केला आहे. सर्वसाधारण महिलांना लुटण्याचा (Fraud) हा नवीन प्रकार समोर आला असून त्यामुळे कोणी काहीही सांगितळे तरी त्यावर विश्वास न ठेवता आधी खात्री करा असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

झाडाला शीर लटकवलं, जंगलात मृतदेहाचे तुकडे सापडले, अल्पवयीन मुलीसोबत नेमकं काय घडलं?

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक चढणार बोहल्यावर; मराठी कलाकारांनी केलं सोहमचं केळवण, पाहा VIDEO

Shengdana Puranpoli: शेंगदाणा पुरणपोळी कशी बनवायची? स्वादिष्ट आणि सोपी रेसिपी जाणून घ्या

Maharashtra Live News Update: सोलापुरात धनंजय मुंडे यांच्या समर्थनात आंदोलन

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 'या' तारखेपासून लागू होणार आठवा वेतन आयोग; समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT